Chetan Bodke
दिल्ली-एनसीआरसह आज संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे हादरे बसले आहेत.
नेमकं भूकंप म्हणजे काय ?, भूकंप कशा प्रकारे होतो. हा प्रश्न सर्वांनाच जाणवतो
भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्यामुळे भूकंप लहरी तयार होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. यालाच भूकंप असे म्हणतात.
भूकंप लहरींची वेग मर्यादा जाणून घेण्यासाठी 'सिस्मोग्राफ'च्या माध्यमातून त्याचे मोजमाप केले जाते.
भूकंप हा सर्वांत वाईट नैसर्गिक धोक्यांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत स्वत:चे आणि इतरांचे रक्षण करणं गरजेचं असतं.
भूकंपजन्य परिस्थितीत घरातील सुरक्षित खोली, मजबूत टेबल, डेस्क किंवा दरवाजा यासारख्या वस्तूंचा आधार घ्यावा.
जर तुमच्याकडे यावस्तू नसतील तर तुम्ही जवळ असलेल्या एका भिंती जवळ थांबा किंवा घराबाहेर सुरक्षित ठिकाणी थांबा.
घराबाहेर असताना भूकंप आला तर तुम्ही इमारती, झाडे आणि वीजेच्या खंब्यापासून दूर असलेल्या सुरक्षित जागेवर उभे राहा.
भूकंप झालेल्या दुर्घटनेत कोणाला काही इजा झाली तर तात्काळ स्थानिक अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधा.
भूकंपजन्य परिस्थितीमध्ये आपात्कालीन संपर्क क्रमांकाची लिस्ट अपडेट करुन ठेवावी.
आपला मुलगा किंवा मुलगी शाळेत असताना भूकंप आला तर तो सुरक्षित स्थळी आहे की नाही याबद्दलची माहिती तुम्हाला तिथे कळेल.
गाडी चालवताना जर भूकंपजन्य परिस्थिती आलीच तर लगेचच आपण सुरक्षित जागेवर उभे राहा.
भूकंपाचे धक्के जाणवत असल्यास गॅस सिलिंडर आणि लाईट्सचे मेन स्विच बंद करा आणि सुरक्षित स्थळी जा.