Ganesh Visarjan 2025 Niyam saam tv
लाईफस्टाईल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका; 10 दिवसांची पुजा ठरेल व्यर्थ

Ganesh Visarjan 2025 Niyam: दहा दिवसांच्या गणपती उत्सवानंतर अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो. हा दिवस खूप महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. मात्र, काही वेळा उत्साहाच्या भरात किंवा अज्ञानामुळे लोक अशा काही चुका करतात, ज्यामुळे त्यांची १० दिवसांची पूजा निष्फळ होऊ शकते.

Surabhi Jayashree Jagdish

  • गणेश विसर्जन योग्य विधीने करणे अत्यंत आवश्यक आहे.

  • विसर्जनापूर्वी व्रत आणि उपवास शुभ मानला जातो.

  • घाईगडबडीत विसर्जन टाळावे.

हिंदू पंचांगानुसार गणेशोत्सवातील दहा दिवसांच्या उत्सवाचा समारोप अनंत चतुर्दशीला म्हणजेच गणेश विसर्जनाने होतो. यावर्षी गणेश विसर्जन आज म्हणजेच ६ सप्टेंबरला पार पडतंय. शास्त्रांनुसार ज्या पद्धतीने गणपती बाप्पाची पूजा विधीपूर्वक केली जाते, त्याच पद्धतीने मूर्तीचे विसर्जन करणं अत्यंत आवश्यक मानलं जातं.

अशी मान्यता आहे की, जर मूर्तीचं विसर्जन योग्य विधीने केलं तर दहा दिवसांच्या पूजनाचं शुभ फल प्राप्त होते. परंतु विसर्जन योग्य पद्धतीने न केल्यास दहा दिवसांची पूजा व्यर्थ ठरते. त्यामुळे विसर्जन करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

विसर्जनापूर्वी अन्न खाऊ नका

गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच व्रत पाळण्याची परंपरा आहे. मूर्तीचे जलामध्ये विसर्जन झाल्यानंतरच भोजन करणं शुभ मानण्यात येतं. असं केल्याने दहा दिवस केलेल्या पूजनाचे संपूर्ण फळ प्राप्त होते.

घाईगडबडीत पूजन आणि विसर्जन टाळा

अनेकदा लोक वेळेअभावी किंवा घाईगडबडीत पूजा करून झटपट मूर्तीचे विसर्जन करतात. परंतु धार्मिक परंपरेनुसार, विसर्जनापूर्वी संपूर्ण विधीने आरती, नैवेद्य व मंत्रोच्चार करणं आवश्यक आहे. हे न केल्यास गणेश विसर्जन अपूर्ण राहते आणि भक्तांना बाप्पाची कृपा लाभत नाही.

मूर्ती कुठेही न ठेऊ नका

गणपती बाप्पाची मूर्ती नदी, तलाव किंवा समुद्रात श्रद्धेने आणि आदरपूर्वक विसर्जित करावी. कचऱ्याच्या ठिकाणी किंवा अस्वच्छ जागी मूर्ती ठेवणं अथवा अर्धवट विसर्जन करणं अशुभ मानलं जातं. अशा प्रकारे केलेल्या विसर्जनामुळे दोष लागतो आणि गणेश कृपा प्राप्त होत नाही.

भावनांमध्ये कमतरता ठेवू नका

गणेश विसर्जनाच्या वेळी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असा जयघोष करून बाप्पाला श्रद्धेने निरोप द्यावा. मूर्ती पाण्यात विसर्जित करताना उदासीनतेपेक्षा सकारात्मक ऊर्जा आणि मंगलभावना मनात ठेवाव्यात. हे अत्यंत शुभ मानले गेले आहे

विसर्जनानंतर पूजासामग्री फेकू नका

गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस भक्तांनी बाप्पाला विविध प्रकारची फुलं, माळा, वस्त्रे आणि पूजासामग्री अर्पण केलेली असते. विसर्जनानंतर ही सामग्री कुठेही टाकू नये. ती स्वच्छ जागी ठेवावी किंवा गाडून टाकावी. असे केल्याने धार्मिक शुद्धता राखली जाते.

वाद टाळा

शास्त्रांनुसार गणेश विसर्जनाच्या वेळी भांडण, मोठ्याने बोलणं, अपशब्दांचा वापर अथवा वादविवाद करणं अशुभ मानलं गेलं आहे. कारण गणेशोत्सव हा पवित्र आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा उत्सव आहे. विसर्जनाची प्रक्रिया शांततेत आणि भक्तीभावाने पार पाडणं श्रेयस्कर आहे.

गणेश विसर्जनापूर्वी भोजन केव्हा करावे?

विसर्जन झाल्यानंतर भोजन करणे शुभ मानले जाते.

गणेश मूर्तीचे विसर्जन कोठे करावे?

नदी, तलाव किंवा समुद्रात श्रद्धेने विसर्जन करावे.

विसर्जनाच्या वेळी कोणत्या भावना ठेवाव्यात?

सकारात्मक ऊर्जा आणि मंगलभावना मनात ठेवाव्यात.

विसर्जनानंतर पूजासामग्री काय करावी?

पूजासामग्री स्वच्छ ठिकाणी ठेवावी किंवा गाडावी.

विसर्जनाच्या वेळी वादविवाद करणे का टाळावे?

गणेशोत्सव हा भक्तिभावाने साजरा करावयाचा असल्याने वाद टाळावा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT