Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ
हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. हा उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. दृक्पंचांगानुसार यावर्षी गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशी एकत्र ६ सप्टेंबर २०२५ रोजी येत आहेत.
या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते, तर दुसरीकडे घराघरात आणि सार्वजनिक मंडपांमधील गणरायांचे विसर्जन पार पडतं. यंदा या शनिवारी या उत्सवात दुर्लभ संयोग लाभत असल्याने या दिवशी दानाचं विशेष महत्त्व मानलं जात आहे.
शनिवारी दानाचे खास महत्त्व
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारच्या दिवशी केलेले दान अनेक पटींनी फलदायी ठरते. असे दान केल्याने शनीदोष कमी होतो आणि जीवनात सकारात्मकता वाढते. अनंत चतुर्दशी शनिवारी आल्याने या दिवशी काले तिळ, तेल, निळी फुले आणि काळ्या रंगाचे वस्त्र यांचे दान करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे.
असं केल्याने शनीदोष शांत होतो आणि भाग्याची साथ लाभते. त्याचप्रमाणे हनुमान मंदिरात दिवा लावणेही मंगलकारी मानलं गेलं आहे, कारण शनिदेवांवर हनुमंताची विशेष कृपा असते.
भगवान विष्णू प्रसन्न करण्याचे उपाय
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू प्रसन्न करण्यासाठी विविध दान करण्याची प्रथा आहे. अन्नदान, वस्त्रदान, कंबल, चप्पल, आर्थिक सहाय्य किंवा विद्यार्थ्यांना पुस्तकांचं दान हे या दिवशी केले तर जीवनातील अडचणी दूर होतात, सुख-समृद्धी वाढते आणि घरात शांतीचे वातावरण निर्माण होते.
अनंत चतुर्दशी २०२५ चे शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, भाद्रपद शुक्ल चतुर्दशी तिथीची सुरुवात ६ सप्टेंबरच्या पहाटे ३ वाजून १४ मिनिटांनी होईल आणि तिचा समारोप ७ सप्टेंबरच्या रात्री १ वाजून ४१ मिनिटांनी होईल. उदया तिथीप्रमाणे अनंत चतुर्दशीचे व्रत आणि गणपती विसर्जन शनिवार, ६ सप्टेंबर २०२५ रोजीच साजरे केले जातील.
यावर्षी या दिवशी रवियोग आणि सुकर्मा योग हे दोन अत्यंत मंगलकारी योग जुळून येत आहेत. त्यामुळे पूर्ण दिवस पूजा, उपासना आणि दानासाठी अत्यंत शुभ मानला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

