Diabetes Health Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Health : मधुमेहींनो, दिवाळीत गोड पदार्थ खाताय? या गोष्टी लक्षात ठेवाच; शुगर राहिल नियंत्रणात

How To Control Sugar Level : रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी या पदार्थांना खाणे सहसा टाळले जाते.

कोमल दामुद्रे

Diwali Diabetes Health :

सणासुदीच्या काळात गोडाचे आणि फराळाचे पदार्थ पाहिले की, अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. परंतु, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी या पदार्थांना खाणे सहसा टाळले जाते.

सध्या भारतात ९० टक्के लोक मधुमेहग्रस्त आहेत. यामध्ये अनेक वयोगटातील लोकांचा समावेश देखील आहे. बदलेली जीवनशैली, तणाव, चिंता आणि झोपेच्या अभावामुळे अनेक मधुमेहासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु, दिवाळीच्या काळात जर तुम्ही गोडाचे पदार्थ खात असाल आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवायचे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवाच. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

  • जर तुमचे वजन अधिक असेल आणि तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर सर्वात आधी वजन कमी करा. ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहाण्यास मदत होईल.

  • मधुमेहाचे (Diabetes) औषध घेत असाल तर आठवड्यातून एकदा मधुमेहाची पातळी तपासत राहा.

  • भाताचे आणि बटाट्याचे सेवन प्रमाणात करा. ज्यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढणार नाही. तसेच रक्तातील साखरेचे (sugar) प्रमाणही वाढणार नाही.

  • आंबा, द्राक्षे यांसारख्या फळांचे अतिसेवन करणे टाळा. आहारात पोषण तत्वाचा समावेश करा. सफरचंद, पपई, संत्रा, नासपती, जांभूळ, पेरू अशा फायबरयुक्त फळे (Fruits) खा.

  • मिठाईचे सेवन करताना अनेकजण शुगर फ्री पदार्थाचा पर्याय निवडतात. परंतु यातून साखर टाळता येते पण यात असणारे फॅट शरीरासाठी हानिकारक ठरते.

  • आहारात तळलेले आणि मसालेदार पदार्थ कमी ठेवले तर फॅट नियंत्रणात राहिल. त्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढेल. तसेच शरीराची हालचाल देखील होणे गरजेचे आहे.

  • मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांपेक्षा तुमच्या जीवनशैलीत बदल करा. पुरेसा आणि सकस आहार घ्या. गोडाचे पदार्थ खाताना गुळ आणि मधाचा शक्यतो वापर करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

SCROLL FOR NEXT