Sweets For Diabetes : मधुमेहींनो, दिवाळीत गोड पदार्थ खायचे आहेत? हे पर्याय ठरतील बेस्ट

Diwali Festival : शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू नये यासाठी मधुमेहाचे रुग्ण गोड खाणे टाळतात.
Sweets For Diabetes
Sweets For DiabetesSaam Tv
Published On

Diabetes People Food Craving :

दिवाळी म्हटलं की, गोडाशिवाय हा सण अपूर्ण असतो. या सणात फराळाच्या ताटापासून ते ऑफिसमध्ये मिळणाऱ्या गिफ्टमध्ये आवर्जून मिळतो तो मिठाईचा बॉक्स. परंतु, शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू नये यासाठी मधुमेहाचे रुग्ण गोड खाणे टाळतात. अशावेळी सणाचा आनंद द्विगुणित होण्याऐवजी तो कमी होतो.

जर तुम्हाला देखील मधुमेहाचा त्रास होत असेल पण गोडाचे पदार्थ खायचे असतील तर यंदाच्या दिवाळीत टेन्शन नकोच. आम्ही तुम्हाला काही पर्यायी पदार्थ सांगणार आहोत ज्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांना गोडाचा आस्वाद घेता येईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. अंजीर बर्फी

अंजीरमध्ये नैसर्गिक साखर (Sugar) असते. त्यापासून बर्फी किंवा साखर न वापरता बर्फी बनवू शकता. तसेच साखरेऐवजी मधाचा वापर करा. ज्यामुळे अधिक त्रास होणार नाही.

Sweets For Diabetes
Rava Ladoo Recipe : रव्याचा लाडू वळवताना फुटतो, प्रमाणही चुकते; परफेक्ट कृती पाहाच, झटपट बनतील

2. मखाणा खीर

मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी मखाण्याची खीर बेस्ट पर्याय आहे. यात असणारे घटक तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील. यामध्ये दूध आणि सुका मेवा याचा वापर करता येईल. तसेच ड्रायफ्रुट्स घालून सजवता येईल.

3. बेसनाचा लाडू

बेसनाचा लाडू (Besan Ladoo) तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. हे बनवण्यासाठी तुम्ही साखरेऐवजी गूळ किंवा मधाचा वापर करु शकता. दिवाळीच्या सणात गोडाचे पदार्थ खाऊन तुम्ही सणाचा आनंद घेऊ शकता.

Sweets For Diabetes
Diabetes Health : दोन आठवड्यात मधुमेह येईल नियंत्रणात, संशोधनातून सिद्ध; अशी घ्या काळजी

4. गाजर हलवा

हिवाळा सुरु झाला असून बाजारात आपल्याला गाजर पाहायला मिळत असतीलच. या काळात आपण गाजरचा हलवादेखील ट्राय करु शकतो. यामध्ये साखरऐवजी गुळाचा वापर करा तसेच तूप आणि मधाचे प्रमाण कमी ठेवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com