Dengue Platelets Count Saam Tv
लाईफस्टाईल

Dengue Platelets Count : डेंग्यूमुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी का होतात? अशावेळी कोणते पदार्थ खावे? जाणून घ्या

Dengue Disease : पावसाळ्यात दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.

कोमल दामुद्रे

Dengue Symptoms :

पावसाळ्यात मलेरिया, टायफाइड आणि डेंग्यू यांसारखे आजार डोकीवर काढतात. सध्या डेंग्यूचा आजार महाराष्ट्रात वेगाने पसरत आहे. या आजारात रक्त कमी होणे, पांढऱ्या पेशी कमी होतात तसेच शरीरात रोगप्रतिकारशक्ती झपाट्याने कमी होते.

या आजारात शरीरातील पाणी कमी होते. तसेच पावसाळ्यात दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतो. या परिस्थितीत हा ऋतू आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना निमंत्रण देतो. परंतु, या आजारात झपाट्याने आपल्या पेशी कमी होतात अशावेळी आहारात कोणते पदार्थ खायला हवे हे जाणून घेऊया.

1. पपईची पाने

पपईची (Papaya) पाने प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी नैसर्गिक उपायांपैकी एक आहे . डेंग्यू तापावर ही पाने खूप गुणकारी ठरतात. त्यात शरीरातील प्लेटलेट्सला वाढवण्याचे घटक असतात. त्यासाठी तुम्ही पपईच्या पानांचा रस पिऊ शकता.

2. कोरफड

कोरफडचा गर पेशी वाढवण्यासाठी रामबाण आहे. यात असणारे गुणधर्म आरोग्याशी अनेक समस्या दूर करतात. यामध्ये प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यास देखील मदत करते. तसेच शरीरात पांढऱ्या रक्त पेशी तयार होण्यास मदत होते.

3. बीटरूट

बीटरूट (Beetroot) शरीरात लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत करते. बीटरूटचा रस प्यायल्याने प्लेटलेटची संख्या वाढण्यास मदत होते. जर तुम्हाला थकवा आणि अशक्तपणाचा त्रास होत असेल तर तुम्ही बीटरूटचा रस पिऊ शकता.

4. दुधीभोपळा

प्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी भोपळा खूप फायदेशीर आहे. यामध्ये पुरेशा प्रमाणात आयन आढळते, ज्यामुळे शरीरातील रक्त वाढते. प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दुधीभोपळ्याच्या रसाचा समावेश करू शकता.

5. डाळिंब

अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेले डाळिंब तुम्हाला प्लेटलेटची संख्या वाढवण्यास मदत करू शकते. त्यात असे गुणधर्म आढळतात, जे रक्त (Blood) वाढवण्यास मदत करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

SCROLL FOR NEXT