Coconut Water Increase Platelets : डेंग्यूमुळे शरीरातील पेशी कमी झाल्या आहेत? नारळपाणी प्यायल्याने फायदा होईल का? तज्ज्ञांचे मत

Dengue Causes : या आजारात पेशी, रक्त आणि शरीरात रोगप्रतिकारशक्ती झपाट्याने कमी होते.
Coconut Water Increase Platelets
Coconut Water Increase PlateletsSaam Tv

Dengue Disease :

पावसाळा म्हटलं की, अनेक आजार डोकवर काढतात त्यातील एक आजार डेंग्यू. सध्या डेंग्यूचा आजार महाराष्ट्रात वेगाने वाढतो आहे. या आजारात पेशी, रक्त आणि शरीरात रोगप्रतिकारशक्ती झपाट्याने कमी होते.

शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी आपण नारळाचे पाणी पितो. या आजारात आपल्याला डिहायड्रेशनच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे डॉक्टर आपल्याला नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. परंतु, नारळ पाणी प्यायल्याने खरेच रोगप्रतिकारशक्ती वाढते का? रक्तातील पेशी वाढण्यास मदत होते का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील तर जाणून घेऊया.

Coconut Water Increase Platelets
Morning Drinks For Glowing Skin : सूर्यासारखी कायम चमकेल त्वचा, रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या 5 ड्रिंक्स; पिंपल्सही होतील गायब

1. नारळाच्या पाण्याने प्लेटलेट्स वाढतात का?

डेंग्यूमुळे (Dengue) शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नारळाच्या (coconut) पाण्यात असे अनेक पोषक घटक असतात जे शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतात. मात्र, नारळपाणी प्यायल्याने डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स वाढतात, असे तथ्यही समोर आले आहे. डेंग्यूच्या वेळी रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी नारळाचे पाणी सर्वोत्तम मानले जाते, असेही त्यांनी सांगितले. आहारतज्ज्ञांच्या मते, नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस सोबत सोडियम आणि कॉपर मोठ्या प्रमाणात असते.

Coconut Water Increase Platelets
Smart and Intelligent Women : इंटेलिजंट महिलांमध्ये असतात खास गुण, कसे ओळखाल?

तसेच डेंग्यू किंवा मलेरिया झालेल्या रुग्णांनी पपईच्या पानांचा रस प्याल्याने देखील प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते. त्यासाठी पपईच्या पानांचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. पपईमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन (Vitamin) ई आणि अँटिऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com