Smart and Intelligent Women : इंटेलिजंट महिलांमध्ये असतात खास गुण, कसे ओळखाल?

कोमल दामुद्रे

समजूतदारपणा

कोणत्याही व्यक्तीचं बोलणं, विचार आणि काम करण्याची पद्धत यावरून ती व्यक्ती किती बुद्धिमान आणि स्मार्ट आहे हे लक्षात येतं.

गुण

इंटेलिजंट महिलांमध्येही अशाच काही सवयी किंवा गुण बघायला मिळतात.

शिकण्याचे प्रयत्न

मला सगळं काही येतं किंवा माहिती आहे, असा दावा कधीही समजूतदार महिला करत नाहीत. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न त्या कायम करत असतात.

प्रश्न विचारणे

समजूतदार महिला कधीही प्रश्न विचारण्यास कचरत नाहीत. असं केल्यानं त्यांना भेडसावणाऱ्या समस्या लवकर सुटण्यास मदत होते.

वाचनाचे वेड

आपला महत्वाचा वेळ कधीही वाया घालवत नाहीत. स्मार्ट महिलांची हीच खरी ओळख आहे. त्यांना वाचनाचं वेड असतं. फावल्या वेळात पुस्तके, मासिकं, ब्लॉग वाचण्यात त्या व्यग्र असतात.

आव्हानांचा सामना

समजूतदार महिला आव्हानांपासून कधीही पळ काढत नाहीत. त्या आव्हानांचा त्या चिकाटीनं सामना करतात.

स्वतःसाठी वेळ देणं

स्वतःसाठी वेळ काढणं, चिंतन-मनन करणं आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहणे हा समजूतदार महिलांचा खास गुण आहे.

मिळून-मिसळून राहणे

आपल्या कुटुंबीयांना वेळ देणं, नवीन लोकांच्या भेटीगाठी, मित्रांसमवेत वेळ घालवणे, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणे या महिलांना आवडतं.

खेळात सहभाग घेणे

स्मार्ट महिला स्वतःला तंदुरुस्त आणि तणावमुक्त राहण्यासाठी खेळात सहभागी होतात. योगासने, व्यायामासाठी वेळ राखीव ठेवतात.

गर्विष्ठ नसतात

स्वतःचंच कौतुक करणं, मी किती स्मार्ट आहे अशा बढाया कधीच त्या मारत नाहीत.

Next : नाशिकमधली ही जागा आहे निसर्गसंपन्न, पावसाळयात हिरव्यागार शालुने बहरतो आसंमत

Most Famous Tourist Place In Nashik | Saam Tv