Clove SAAM TV
लाईफस्टाईल

Clove : औषधी गुणांनी समृद्ध 'लवंग', वाचा काय आहेत फायदे अन् तोटे

Health Care Tips : पावसाळ्यात दमट हवामानामुळे आणि अस्वच्छतेमुळे आजारांचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात सर्दी , खोकल्यासारखे संसर्गजन्य आजार होतात. यावर मसाल्यांमधील लवंग फायदेशीर ठरते.

Parag Kharat

पावसात भिजायला अनेकांना आवडते. पावसात भिजण्याचा आनंद काही औरच असतो. काही मंडळी तर पावसाळ्यात मस्त फिरायला जातात. मनसोक्त भिजतात. पावसात भिजण्याचा आनंदात काही लोकांना सर्दी - खोकला होतो. तुम्हाला जर सर्दी -खोकला झाला असेल तर, रात्री झोपायच्या आधी २ लवंग खाल्ल्याने शरीराला आराम मिळतो.

आरोग्यासाठी लवंग गुणकारी

लवंग हे प्रत्येक गृहिणीच्या किचन मध्ये सापडेल आपण जेवण बनवताना लवंग वापरतो. अन्नात लवंग वापरल्याने एक विशिष्ट चव अन्नाला प्राप्त होते. लवंगचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. लवंग मध्ये औषधी गुणधर्मही आहेत. लवंग जंतुनाशक, विषाणूनाशक आहे. लवंग मध्ये अँटी ऑक्साईड असल्यामुळे शरीरात होणाऱ्या बॅक्टेरीया पासून आपले संरक्षण होते. लवंग आणि त्यापासून मिळणारे तेलही फायदेशीर आहे. मात्र शरीराला जास्त मसाल्यांच सेवन करणे हानिकारक आहे.

लवंग मध्ये फायबर, व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियम असते. मॅग्नेशियम हे मेंदूला योग्य कार्य करण्यासही मदत करते. लवंगमुळे हाडे मजबूत होतात. लवंगमध्ये कॅलरीज कमी असते आणि फायबर जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यास उपयोग होतो. लवंग मध्ये फायबर असल्यामुळे पचनशक्तीही वाढवते.

दातांसाठी लवंग उपयुक्त

लवंग मध्ये सूक्ष्म जीवविरोधी गुणधर्म आहेत. आपल्या तोंडातल्या खराब बॅक्टेरीयाचा नाश करण्यास ही मदत होते. तोंडाच्या दुर्गंधीला कमी करण्यास मदत करते. तसेच दातांना जर वेदना होत असतील तर २ लवंग दातामध्ये ठेवल्या की वेदना कमी होतात.

मधुमेह

डायबिटीस लोकांना लवंग गुणकारी आहे. लवंग शरीरातील साखरेला कंट्रोल करते. जास्त प्रमाणत जर सेवन केलं तर रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते. लवंग शस्त्रक्रियाच्या आधी आणि नंतर खाण्याचा सल्ला दिला जात नाही.

लवंग शरीरासाठी हानिकारक

कुठल्याही गोष्टीचं जास्त प्रमाणात सेवन करणं हानिकारक आहे. त्याप्रमाणेच लवंग जास्त प्रमाणत सेवन करणं हानिकारक ठरू शकतं. लवंग मध्ये युजेनॉल पदार्थ असतो. ज्यामुळे शरीरातील रक्त गोठण्याची जी प्रक्रिया असते ती मंदावते. डॉक्टरांनी जेवढे प्रमाण सांगितलं आहे तेवढेच प्रमाण योग्य आहे. तसं नाही केलं तर आतड्यामधून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असू शकते.

लवंग चे जसे फायदे आहेत तसे शरीराला नुकसान ही आहे तेव्हा लवंग खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लवंग सेवन करणे धोकादायक आहे.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT