Health Tips : फक्त जेवणाचा स्वाद नाही तर आरोग्यासाठी देखील वरदान आहेत किचनमधील हे ५ मसाले

Indian Spices Effect on Health : प्रत्येक मसाल्याची चव जेवणातील स्वाद वाढवते. फक्त जेवणातील स्वाद नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील मसाले फार उपयुक्त ठरतात.
Indian Spices Effect on Health
Health Tips Saam TV
Published On

भारत देश आपल्या स्पेशल मसाल्यांसाठी ओळखला जातो. भारतात विविध प्रकारचे मसाले निर्माण होतात. यातील प्रत्येक मसाल्याची चव जेवणातील स्वाद वाढवते. फक्त जेवणातील स्वाद नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील मसाले फार उपयुक्त ठरतात.

Indian Spices Effect on Health
health tips : आता मनसोक्त पादा; वाचा पादण्याचे महत्वाचे फायदे

अनेक व्यक्तींना आपल्या घरात सहज उपलब्ध असलेल्या मसाल्यांची काहीच माहिती नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आपल्या भारतीय मसाल्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि फायदे याबाबत माहिती सांगणार आहोत.

दालचिनी

आपल्या आरोग्यासाठी दालचिनी फार फायदेशीर आहे. दालचिनी हा मसाल्याचा पदार्थ तुम्ही जेवणात हमखास वापरत असाल. याच दालचिनीमुळे तुम्हाला पोट साफ होण्यास मदत होते. तुम्हाला गॅस आणि पोट साफ न होण्याची समस्या असेल तर तुम्ही दालचिनी चहामध्ये उकळवून पिऊ शकता.

हिंग

ॲसिडिटी आणि आंबट ढेकर येणे अशा समस्या काही व्यक्तींना असतात. तुम्हालाही या समस्या आतील असतील तर हिंग यावर काम करेल. तुम्ही हिंग जेवणात किंवा जास्त त्रास असेल तर एक ग्लास गरम पाण्यात मिक्स करून त्याचे सेवन करू शकता.

ओवा

काही व्यक्तींना अपचन होत असल्याने पोट दुखते. सतत पोट दुखणे ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे पोट दुखीवर रामबाण उपाय म्हणून तुम्ही ओवा काही शकता. जर तुमचे पोट दुखण्यास सुरुवात झाली तर थोडा ओवा आणि खोबरं तुम्ही एकत्र चावून खाल्ले पाहिजे.

अद्रक

अद्रक सुद्धा चहा पासून ते विविध पदार्थ बनवण्यासाठी आपण वापरत असतो. अद्रकमध्ये अन्न पचवण्याची ताकद असते. अद्रकमुळे जेवणाला छान स्वाद येतो.

जिरे

ज्या व्यक्तींना सकाळी पोट साफ होण्यास अडचणी असतात. त्यांनी जिरे पाण्यात भिजत ठेवून त्याचे पाणी सकाळी उठल्या उठल्या प्यायले पाहिजे. जिरे असलेले पाणी पिल्याने पोट पटकन साफ होते. तसेच पोट दुखण्याच्या अनेक समस्या नीट होतात.

Indian Spices Effect on Health
Akola News: अकोल्यात दूषित पाणी प्यायल्याने 60 हून महिला पोलिसांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात करण्यात आलं दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com