health tips : आता मनसोक्त पादा; वाचा पादण्याचे महत्वाचे फायदे

तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.
health tips
health tipsCanva
Published On

health tips : पादणं हे अगदी नैसर्गिक आहे. अनेक वेळा जास्त जेवण झाल्यावर पँट सैल करावी लागते कारण पोटात गॅस तयार झालेला असतो. तसे न केल्यास पोट दुखू लागते. त्यामुळे पोटातला गॅस बाहेर पडणे गरजेचं आहे. (Latest Marathi News)

मात्र अनेक व्यक्ती यावर हासतात. प्रत्येकाच्या घरात एखादे आजोबा किंवा असे कोणी ना कोणी असतात जे पादणं रोखून ठेवू शकत नाही आणि सगळ्यांसाठी हासं बनतात. तरुणांमध्ये देखील हे प्रमाण पाहायला मिळतं. त्यामुळे आज पादण्याचे काही फायदे जाणून घेऊ.

पाद कधीही रोखून ठेवू नये. तसे केल्यास तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. जेव्हा शरीरात गॅस तयार होतो तेव्हा तो लगेच बाहेर काढावा अन्यथा इतर दुखणी सुरू होतात.

अनेक वेळा अपचन झाल्यावर देखील पोटात गॅस तयार होतो. यावेळी काहींना डोके दुखी जाणवते. त्यामुळे कामात चिडचिड होते. तसेच पोट दुखू लागते. त्यामुळे अशा वेळी थंड पदार्थ अथवा जास्त पाणी प्यावे.

पादण्याच्या त्रासावर तुम्हाला कोणता आजार आहे का हे देखील समजण्यास मदत होते. पादताना घाणेरडा दर्प येतो. अशावेळी काहींना वेदना जाणवतात जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील वृध्द व्यक्तींना असा त्रास जाणवत असेल तर हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यावर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

health tips
Health Tips : PETA इंडियाचा अनोखा उपक्रम... अंडी नाहीत काही हरकत नाही, व्हेगन खाऊन तर बघा

जेवणात जास्त मांसाहार असल्यास त्या व्यक्तींना या समस्या जास्त जाणवतात. त्यामुळे त्यांनी आपल्या आहारात पालेभाज्यांचे सेवन करावे. त्याने देखील पाद नियंत्रणात येण्यास मदत होते.

health tips
Winter Health Care : हिवाळ्यात शरीरात उष्णता टिकवून ठेवतील 'हे' 4 पदार्थ, आजच आहारात समावेश करा

पाद थांबवल्यास आतड्यांना सूज येते. यामुळे पुढे काही गंभीर आजार होऊ शकतात. वृध्द व्यक्तींच्या शरीराची हालचाल होतं नाही. त्यामुळे त्यांना या समस्या जास्त जाणवतात. अशात पाद थांबल्याने याचा थेट परिणाम त्यांच्या आतड्यांमध्ये होतो. पुढे याचे निदान कर्करोगात देखील झाल्याचे काही व्यक्तींमध्ये आढळल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com