Winter Health Care : हिवाळ्यात शरीरात उष्णता टिकवून ठेवतील 'हे' 4 पदार्थ, आजच आहारात समावेश करा

वाढत्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी फायदेशीर ठरतील हे पदार्थ
Winter Health Care
Winter Health CareSaam tv

Winter Health Care : राज्यात सध्या थंडीची लाट पसरली आहे. तसेच काही ठिकाणी अवकाळी पावसाने देखील हजेरी लावली आहे. यात काही व्यक्तींना थंडी अजिबात सहन होत नाही. अंग दुःखी, सर्दी, खोकला आणि ताप अशा समस्या होतात. त्यामुळे शरीरात ऊर्जा कायम ठेवणे गरजेचे असते. यासाठी काही पदार्थांचे सेवन करणे फायद्याचे ठरू शकते.

आपल्या रोजच्या जेवणात तुम्ही जे अन्नधान्य खाता त्यात योग्य धान्याची निवड केल्यास तुम्हाला फायदा होईल. थंडीपासून बचाव होईल. थंडीपासून वाचण्यासाठी अनेक व्यक्ती शेकोटीचा आधार घेतात. परंतु, शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आपण आहारात काही पदार्थांचा समावेश करायला हवा.

Winter Health Care
Winter Health Tips : हिवाळ्यात सर्दी-फ्लूचा आजार का वाढतो ? या आजारात कशी घ्याल आरोग्याची काळजी

1. बाजरी

बाजरी ही गरम असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीच्या भाकरीचे सेवन करावे. ही भाकरी खाल्याने लोह, फायबर आणि पोटॅशियम मिळते. बाजरी थोडी राखाडी रंगाची असते. याची भाकरी देखील अशीच बनते. त्यामुळे ही भाकरी थंडीत खावी.

2. ज्वारी

थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही ज्वारीची भाकरी देखील खाऊ शकता. या भाकरीचा रंग थोडा सफेद असतो. यामध्ये देख लोक आणि फायबर असते. त्यामुळे या भाकरीचे सेवन केल्याने ऊर्जा मिळते. तसेच ज्वारी फार गुणकारी आहे. अन्य काही आजारावर (Disease) देखील याचे सेवन केल्यास प्रोटीन मिळते.

Winter Health Care
Winter Health Carecanva

3. मका

सध्या बाजारात मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच मका स्वस्त देखील आहे. त्यामुळे मक्याची भाकरी खाणे गरजेचे आहे. तुम्ही मका उकडवून, भाजून देखील खाऊ शकता. तसेच याच्या पिठाची भाकरी करून खाल्याने देखील खूप फायदा (Benefits) होतो. या क आणि अ अशी दोन जीवनसत्व (Vitamins) आहेत. मका शरीरात ऊर्जा ठेवतो.

4. कुट्टू

सहसा कुट्टुची भाकरी उपवासाला खाल्ली जाते. अनेक महिला उपवासासाठी ही भाकरी खातात. याने शरीरात ताकत आणि ऊर्जा कायम राहते. त्यामुळे थंडीच्या दिवसात तुम्ही या धान्याची भाकरी देखील खाऊ शकता. थंडीपासून बचाव करण्यासाठी आम्ही सांगितलेली ही धान्ये बाजारात सहज उपलब्ध आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com