Go Vegan Tip from PETA: थंडी आणि अंडी याचा हिवाळ्यात परिपूर्ण मेळ जमतो. हिवाळा म्हटलं की, शरीरात उष्णतेची आवश्यकता प्रत्येकाला असते. जीमला जाणारे, व्यायाम करणारे नियमित अंडी खातात परंतु, सध्या कडाक्याच्या थंडीत अंड्याचे भावही कडाडले आहेत.
त्यातच एक कोटी अंड्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रथिनांनी भरलेले टोफू पासून बनलेले वेगन अंडा भुर्जी सॅण्डविचचे मोफत वाटप केले आहे. हे सॅण्डविच वाटताना कोंबडीची वेशभूषा परिधान करून संदेशही दिला आहे.
कोंबडीची वेशभूषा परिधान करुन अंडी नाहीत ? काही हरकत नाही पण व्हेगन अंडी खाऊन तर बघाच. पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स म्हणजेच पिटा इंडियाचे समर्थक यांनी नागपूरच्या इंटरनिटी मॉल समोर संदेश देत अनोख्या पद्धतीने वेगन तयार अंडा भुर्जी आणि सॅण्डविचचे मोफत वाटप केले.
महाराष्ट्रात (Maharashtra) दररोज आढळणाऱ्या एक कोटी अंड्याच्या तुटवडा भरून काढण्यासाठी प्रथिनांनी भरलेले टोफू पासून बनलेले वेगळे अंडा भुर्जी सँडविच वाटप करण्यात आले. पक्षांच्या (Birds) प्रति दयाळू असणे आणि मानवी आरोग्यासाठी हे चांगले आहे. अंडी उत्पादन क्रूरच नाही तर पूर्णपणे अनावश्यक देखील आहे. असा संदेश PETA इंडियाने दिला आहे. टोफू डाळ, चणे, शेंगदाणे आणि इतर अनेक वनस्पती आधारित पदार्थ प्रथिनेयुक्त असतात तर अंडी कॉलेस्ट्रिल आणि संतुप्त चरबीने भरलेले असतात. ज्यामुळे आरोग्यासाठी (Health) हानिकारक होऊ शकतात.
अंड्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोंबड्या वायर बॅटरी पिंजरा इतक्या अरुंद जागेत ठेवलेल्या असतात की त्यांना पंख देखील उडवता येत नाहीत. आत असलेल्या कोंबड्या एकमेकांना चोच मारतात. त्यामुळे त्यांच्या चोचेचा काही भाग जळत्या गरम ब्लेडने कापतात.
नरपिलांना अंडी देता येत नसल्याने अंडी उद्योग निरुपयोगी असलेल्या नरपिलांना बुडवून मारतात किंवा शेतातील माशांना जिवंत खाऊ घालतात. यासारख्या भयंकर पद्धतीने अंड्यामधून बाहेर आल्यावर लगेचच मारले जाते. हे सगळं थांबण्यासाठी म्हणून व्हेगन अंडीचा वापर करा असा संदेश पिटाचे वॉलेंटियर पलाश मडकवांर यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.