Akola News: अकोल्यात दूषित पाणी प्यायल्याने 60 हून महिला पोलिसांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात करण्यात आलं दाखल

Akola Police Training Centre News: अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील तब्बल 60 हून अधिक महिला पोलिसांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
Kolhapur News
Kolhapur NewsSaam Tv

अक्षय गवळी, अकोला

Akola Police Training Centre News:

अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील तब्बल 60 हून अधिक महिला पोलिसांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. दूषित पाणी प्यायल्यानं ट्रेनिंगवर असलेल्या या महिला पोलिसांची प्रकृती अचानक बिघडली आहे, असं सांगण्यात येत आहे. त्यात वाढत्या उन्हाच्या पारामूळ त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. त्यामुळ गेल्या काही दिवसांपासून त्यांना मळमळ आणि उलट्या होत होत्या.

आज या सगळ्या महिला पोलिसांना अकोल्यातल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुरुवातीला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना कुठल्याही फरक न जाणवल्याने या सर्वांनी खाजगी रुग्णालयात दाखल झाले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kolhapur News
Nilesh Lanke Resign: मोठी बातमी! निलेश लंके यांनी आमदारकीचा दिला राजीनामा

जवळपास 60 पेक्षा जास्त महिला पोलिसांवर उपचार सुरू आहे. तर काहींना प्रथमोपचार करून परत पाठवण्यात आले आहे. काही मुलींवर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून उपचार सुरू आहे.  (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, दूषित पाणी प्यायलामुळे जवळपास 200 पेक्षा जास्त महिला पोलिसांची प्रकृती अचानकपणे बिघडली आहे, असं प्राथमिक कारण समोर येतंय. तर काहींना उन्हाचा फटका बसलाय. काही महिला पोलीस या पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने त्यांच्या वातावरणात बदल झाला असावा, त्यामुळेच त्यांच्या प्रकृती बिघडली असावी, असं सांगण्यात येत आहे.

Kolhapur News
Lok Sabha Election 2024: सत्तेत आल्यास सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देणार, काँग्रेसची मोठी घोषणा

दरम्यान, यातील एका तरुणीला डेंगू, तर 80 टक्के मुलींना कावीळ आजाराची लागण झाली, असल्याचे डॉक्टर सांगतायेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी या सर्व आजारी महिला पोलिसांची भेट घेतली. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशा सुचानाही त्यांनी दिल्या आहे. दूषित पाण्यामुळे हा आजार झाला आहे. तरी याचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासनाने करावा, अशी मागणी मिटकरींनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com