Nilesh Lanke Resign: मोठी बातमी! निलेश लंके यांनी आमदारकीचा दिला राजीनामा

MLA Nilesh Lanke News: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
Nilesh Lanke Resign News
Nilesh Lanke Resign NewsSaam Tv
Published On

>> सुशील थोरात

Nilesh Lanke Resign News:

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आता आमदार निलेश लंके हे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याच्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके हे शरद पवार गटात पक्षप्रवेश करतील अशी चर्चा होती. यातच त्यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना निलेश लंके हे भावुक झाले होते.

'जे बोलतो, ते करतो'

आपल्याला पुढे लोकसभा निवडणुकीला सामोरे जायचं आहे. कोणीही पुढे कायद्याच्या चौकटीत आपल्याला अडकवायला नको, असं म्हणत त्यांनी निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते म्हणाले, 'जे बोलतो, ते करतो'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nilesh Lanke Resign News
Akola News: अकोल्यात दूषित पाणी प्यायल्याने 60 हून महिला पोलिसांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात करण्यात आलं दाखल

राजीनामा दिल्याचं जाहीर करण्याआधी निलेश लंके यांनी आज आपल्या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर यांनी या लोकसभेला आपण महाविकास आघाडी कडून मैदानात उतरत असल्यास जाहीर केले. त्यामुळे आता अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध आमदार निलेश लंके अशी सरळ लढत होणार आहे.  (Latest Marathi News)

दरम्यान, निलेश लंके यांनी आज आपली भूमिका जाहीर केल्यामुळे आता अहमदनगर दक्षिण मतदारसंघात निलेश लंके विरुद्ध डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे. या चुरशीच्या लढाईत बाजी कोण मारेल याबाबत निवडणूक निकालानंतर कळेलच.

Nilesh Lanke Resign News
Lok Sabha Election 2024: सत्तेत आल्यास सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देणार, काँग्रेसची मोठी घोषणा

कोण आहेत निलेश लंके?

निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले. लंके यांचं 12 वी पर्यंत शिक्षण झालं असून नंतर त्यांनी आयटीआय केलं. निलेश लंके यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतून केली होती. ते वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी शिवसेनेच्या शाखा प्रमुख झाले. त्यांनी पक्षात काम करत असताना हंगा गावची ग्रामपंचायत जिंकली होती. पुढे 27 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या एका वादातून त्यांना शिवसेनेतून काढण्यात आलं. शिवसेनेतून काढल्यानंतर लंके यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com