Chronic Fatigue Syndrome : रात्रभर झोपूनही सकाळी झोप येते? डोक दुखते? असू शकतो गंभीर आजार, वेळीच घ्या काळजी

Chronic Fatigue Syndrome Disease : काही लोकांना रात्रीची पुरेशी झोप लागल्यानंतरही दिवसभर झोप येत असेल, थकवा जाणवत असेल किंवा आळसावले असाल तर त्याचा तुमच्या कामावर गंभीर परिणाम होतो.
Chronic Fatigue Syndrome
Chronic Fatigue SyndromeSaam Tv
Published On

Chronic Fatigue Syndrome Symptoms :

दिवसभर काम आणि तणाव आल्यानंतरही अनेकांना रात्रीची व्यवस्थित झोप लागत नाही. परंतु, काही लोकांना रात्रीची पुरेशी झोप लागल्यानंतरही दिवसभर झोप येत असेल, थकवा जाणवत असेल किंवा आळसावले असाल तर त्याचा तुमच्या कामावर गंभीर परिणाम होतो.

हा आजार (Disease) क्रॉनिक फॅटीग सिंड्रोम म्हणून ओळखला जातो. ही समस्या कशी होते. याची लक्षणे (Symptoms) कोणती? यावर उपाय कसे कराल? जाणून घेऊया

1. क्रॉनिक फॅटीग सिंड्रोम लक्षणे

  • स्मृतीभ्रंश

  • सतत डोकेदुखी (Headache)

  • दिवसभर झोप

  • स्नायू आणि सांधे दुखणे

  • दीर्घकाळ खोकला

  • थंडी वाजणे

  • जास्त घाम येणे

  • मनस्थिती वाईट होणे

  • डोळ्यांची जळजळ आणि कोरडेपणा

  • काम करण्याची इच्छा न होणे

  • भूक न लागणे

Chronic Fatigue Syndrome
Hair Care Tips : कोरड्या केसांसाठी फायदेशीर ठरेल चहाचे पाणी, असा करा वापर

2. कारणे

  • ही समस्या कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना अधिक प्रभावित करते. अशा लोकांना कामाचा ताण वाढला की, थकवा जाणवू लागतो.

  • बॅक्टेरियाचे संक्रमणही यासाठी कारणीभूत ठरु शकते.

  • लो ब्लडप्रेशरच्या समस्येने त्रस्त असलेले लोकही या समस्येला बळी पडतात.

  • ही समस्या दीर्घकाळपर्यंत ताणतणाव आणि कोणत्याही प्रकारच्या हार्मोनल असंतुलनामुळे देखील होऊ शकतो.

Chronic Fatigue Syndrome
Diabetes Health : मधुमेहाच्या रुग्नांनी 'या' पदार्थांचे सेवन केल्यास होईल फायदा

3. उपाय काय?

  • क‌ॅफिनचे सेवन कमी करा

  • अल्कोहोल आणि निकोटीनवरही नियंत्रण ठेवा.

  • थकवा दूर करण्यासाठी दिवसभर झोपण्याची सवय चांगली नाही. यामुळे रात्रीची झोप खराब होते.

  • ऑफिसचे काम घरपर्यंत आणू नका. यामुळे कामाचा ताण वाढतो.

  • छोट्या छोट्या गोष्टींवर ताण घेण्याची सवय सोडा.

  • शरीर नेहमी सक्रीय आणि उत्साही ठेवण्याचा प्रयत्न करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com