Hair Care Tips : कोरड्या केसांसाठी फायदेशीर ठरेल चहाचे पाणी, असा करा वापर

Tea Leaf Water Benefits For Hair : केसगळती आणि कोरड्या केसांसाठी आपण अनेक प्रकारचे केमिकल उत्पादने वापरतो. त्यामुळे केस अधिकच रुक्ष होऊ लागतात. उन्हाळ्यात केस अधिक कोरडे आणि निर्जीव होतात.
Hair Care Tips, Tea Leaf Water Benefits For Hair
Hair Care Tips, Tea Leaf Water Benefits For HairSaam Tv

Hair Problem :

केसगळती, केसांची वाढ खुटणे, केसात कोंडा होणे यांसारख्या समस्येमुळे हल्ली अनेकजण त्रस्त आहेत. वय वाढू लागले की, शरीरात अनेक बदल होतात. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती केसगळती आणि पांढऱ्या केसांच्या समस्येमुळे त्रस्त आहेत.

केसगळती (Hair Care) आणि कोरड्या केसांसाठी आपण अनेक प्रकारचे केमिकल उत्पादने वापरतो. त्यामुळे केस अधिकच रुक्ष होऊ लागतात. उन्हाळ्यात केस अधिक कोरडे आणि निर्जीव होतात. जर तुम्ही देखील रुक्ष आणि कोरड्या केसांमुळे त्रस्त असाल तर चहाच्या पाण्याचा वापर करु शकता. हे पाणी (Water) केसांसाठी कंडिशनरसारखे काम करते. कसे वापरायचे जाणून घेऊया.

1. चहाच्या पानाचे पाणी कसे वापरायचे पाहूया

  • हेअर कलर ब्रशच्या मदतीने तुम्ही चहाच्या पानाचे पाणी केसांना लावू शकता. हे लावल्यानंतर एक तासाने केस स्वच्छ पाण्याने धुवा. असे नियमित केल्याने केस काळे राहू शकतात.

  • केसांना मऊ आणि शाइन बनवण्यासाठी चहाच्या पानाच्या पाण्याचा कंडिशनर म्हणून वापर करा. त्यासाठी चहाच्या पाण्यात कोरफड जेल मिसळून केसांना लावा. थोडा वेळ तसेच राहू द्या आणि केस पाण्याने स्वच्छ धुवा

  • चहाच्या पानाच्या पाण्याने हेअर स्प्रे बनवू शकता. हा हेअर स्प्रे तुमच्या टाळूवर स्प्रे करा आणि ४५ मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे केसगळती रोखण्यास मदत होते.

Hair Care Tips, Tea Leaf Water Benefits For Hair
Thyroid : वाढत्या थायरॉइडच्या समस्येकडे करु नका दुर्लक्ष, आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

2. चहाचे पाणी कसे बनवायचे?

चहाचे पाणी सहज तयार करता येते. यासाठी एका भांड्यात एक लिटर पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे चहाची पाने घाला. हे पाणी गॅसवर उकळण्यासाठी ठेवा. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी थंड होऊ द्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com