Thyroid : वाढत्या थायरॉइडच्या समस्येकडे करु नका दुर्लक्ष, आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Thyroid Issue : थायरॉईड हा हार्मोनल आजार आहे. ज्याची काळजी न घेतल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. याचा सर्वाधिक धोका महिलांना असतो.
Thyroid Disease, Thyroid
Thyroid Disease, ThyroidSaam Tv

Thyroid Symptoms :

थायरॉईड हा हार्मोनल आजार आहे. ज्याची काळजी न घेतल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. याचा सर्वाधिक धोका महिलांना असतो. थायरॉईड ही ग्रंथी आहे, ज्यामध्ये शरीरात असंतुलन निर्माण होते.

बदलती जीवनशैली (Lifestyle), खाण्यापिण्याच्या सवयींमुळे ही समस्या अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. वाढलेल्या थायरॉईडच्या स्थितीला हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम असे म्हणतात. जेव्हा थॉयरॉईड ग्रंथी शरीरात थायरॉईड संप्रेरक तयार करत नाही तेव्हा हायपोथायरॉईडीझम होतो. हायपरथायरॉईडीझममध्ये जास्त थायरॉईड संप्रेरक तयार होतात. याची लक्षणे (Symptoms) कोणती जाणून घेऊया

थायरॉईड ग्रंथी नाजूक फुलपाखरासारखी दिसत असली तरी शरीराची वाढ, मेंदूचे कार्य, प्रजनन संस्थेचे संतुलन आणि एकूणच चयापचयाच्या क्रियेचे नियमन ही अत्यंत महत्त्वाची कामे या थायरॉइड ग्रंथीच्या संप्रेरकाच्या कार्यावर परिणाम करतात.

1. थायरॉईडची सुरुवातीची लक्षणे कोणती?

  • थायरॉईडची सुरुवातीची लक्षणे ही हार्मोन्सचे जास्त किंवा कमी उत्पादन आहे यावर अवलंबून आहे. काही सामान्य लक्षणे आहेत ज्याकडे दुर्लक्ष करणे कठीण असू शकते.

  • जसे की, पुरेशी झोप घ्या ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही

  • अचानक वजन कमी होणे किंवा वजन वाढणे

  • निद्रानाश किंवा जास्त झोप येणे

  • उग्र त्वचा किंवा केसगळती

Thyroid Disease, Thyroid
Heart Attack In Women : सलग ११ तास बसल्याने महिलांमध्ये वाढतेय हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण, कशी घ्याल काळजी?
  • स्नायू कमकुवत होणे किंवा सांधेदुखी

  • वाढलेली किंवा कमी हृदयाची गथी

  • मासिक पाळीत बदल, नियमितपणे न येणे

  • मानेला सूज येऊ शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com