कोमल दामुद्रे
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आयुर्वेदात अनेक औषधी वनस्पतींना प्राधान्य दिले आहे.
आजकाल अगदी लहान मुलांना त्यांच्या खराब जीवनशैलीमुळे मधुमेहासारखे आजार होत आहे.
आयुर्वेदामध्ये काही अशा वनस्पती आढळतात ज्यामुळे मधुमेहाचा धोका भरपूर प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
कडुनिंबामध्ये बायोएक्टिव्ह आढळतं ज्यामुळे शरीरातील इंसुलिनची क्षमता वाढते आणि ग्लुकोज शोषण्यास मदत करते.
दालचिनी रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते त्यामुळे त्याचे सेवन केल्यास मदत होते.
हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं घटक आढळतं ज्यामुळे शरीरातील साखर नियंत्रित राहण्यास मदत करते.
मेथी दाण्यामध्ये ट्रायगोनेलिन सारखे पदार्थ आढळतात, ज्यामुळे शरीराताल इन्सुलिनची मात्रा वाढते.
आवळ्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स मधुमेहाच्या रुग्नांसाठी फायदेशीर ठरते.
डिस्क्लेमर
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.