कोमल दामुद्रे
प्रत्येकाला आपले केस लांबसडक आणि दाट असावे असे वाटते. यासाठी आपण अनेक महागातले सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो.
केसांची काळजी घेण्यासाठी कधीकधी केमिकल उत्पादने हानिकारक ठरु शकते.
केस लांब आणि घनदाट हवे असल्यास काही घरगुती गोष्टींचा टिप्स फॉलो करा
कांद्याचा रस केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्या वापराने केस मजबूत आणि दाट होतात. त्यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांना लावावा.
अंडी केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केसांना लावून काही वेळाने केस धुवा, असे केल्याने केस मऊ होतील.
केस गळण्याच्या समस्येपासून त्रस्त असाल तर खोबऱ्याचे तेल केसांना लावा. असे केल्याने केस अधिक लांब आणि मजबूत होतील.
मालिश करा
आठवड्यातून दोनदा केसांना खोबऱ्याच्या तेलाने मालिश केल्यास केस गळती थांबते.
केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी लॅव्हेंडर, जोजोबा आणि बदामाचे तेल मिसळून लावावे. यामुळे केस लांब आणि दाट होण्यास मदत होते.
कोरफडीचा गर केसांसाठी खूप फायदेशीर आहे. नियमितपणे हे लावल्याने केसांच्या वाढीसाठी फायदा होतो.
डिस्क्लेमर
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.