Ear Health : कान स्वच्छ करताना 'इअरबड्स' चा वापर करताय? व्हा सावधान! अन्यथा येऊ शकतो बहिरेपणा

Earbuds Use : अनेक जण बऱ्याच वेळा कानामध्ये इअरबड्स घालून वारंवार कान साफ करतात. मात्र आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आहे. तज्ज्ञांच्या मते, कानाची स्वच्छता कशी करावी? जाणून घ्या.
Earbuds Use
Ear HealthSAAM TV
Published On

कान हे शरीराचे महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. कानाशिवाय जगणे कठीण आहे. त्यामुळे कानाची विशेष काळजी घ्यावी. कानात मळ साचतो. ज्यामुळे आरोग्य धोक्यात येते. बाहेरचे जंतू, धूलीकण कानात जातात .ज्यामुळे कानात बॅक्टेरियाचा संसर्ग होतो. असे होऊ नये म्हणून नियमित योग्य पद्धतीने कान स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.

कान स्वच्छ करण्याची योग्य वेळ काय?

वारंवार कानामध्ये इअरबड्स घालू नये. त्यामुळे कानाचे आरोग्य धोक्यात येते. तुमचा कान दुखत असेल, कानातून शिट्टीसारखा आवाज येत असेल किंवा ऐकू कमी येत असल्यास कानातील मळ स्वच्छ करावा. कान कधीही सकाळी ओघळीला जाण्यापूर्वी स्वच्छ करावे.

इअरबड्सचा वापर टाळा

विनाकारण इअरबड्सने कान स्वच्छ करणे तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे कधीही कान इअरबड्सने स्वच्छ करू नये. त्यामुळे कानाला इजा होण्याची शक्यता असते. कानाच्या पडद्याला इजा होते. इअरबड्सच्या वापरामुळे बऱ्याच वेळा कानातील घाण , मळ कानाच्या आतील बाजूला सरकतो. त्यामुळे समस्या अजून वाढते. कॉटन इअरबड्समुळे कान स्वच्छ केल्यास संसर्गाचा धोका वाढतो.

Earbuds Use
Dry Fruits Benefits : पावसाळ्यात चांगलं आरोग्य हवंय? मग दररोज खा भिजवून 'हे' ड्रायफ्रुट, आजार जातील पळून

कान साफ कसे करावे?

कोमट पाणी

कानात कोमट पाणी घालून कापसाच्या मदतीने कान स्वच्छ करून घ्या. कालांतराने कान उलट करा आणि पाणी बाहेर काढा.

तेल

कान स्वच्छ करण्याचा उत्तम उपाय म्हणजे कानात तेल घाला. रात्री झोपताना कानात तेल घालून झोपा आणि सकाळी कान स्वच्छ करा. कानात तेल घातल्याने आतील घाण किंवा मळ बाहेर येतो. वर आलेला मळ तुम्ही कापडाच्या मदतीने सहज काढू शकता. त्यानंतर आंघोळ करताना कान स्वच्छ धुवा.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Earbuds Use
Knee Pain Home Remedy : गुडघ्यांच्या वेदना असह्य झाल्यात, काही केल्या आराम नाही; मग 'हा' जालीम उपाय आजच करा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com