Parenting Tips Saam TV
लाईफस्टाईल

Parenting Tips : मुलं शाळेत जाण्याचा कंटाळा करतात; 'या' 5 टिप्सने हट्टीपणा होईल कमी

Parenting Tips For School Students : काही मुलं शाळेत जाण्यासाठी घाबरतात. कुरकुर करतात. मात्र पालकांना घाबरण्याची गरज नाही आम्ही दिलेल्या टिप्सने तुमचा मुलगा शाळेतही जाईल आणि अभ्यासातही प्रगती करेल.

Parag Kharat

शाळा सुरू होऊन एक महिना झाला आहे. मात्र अजून काही मुलं शाळेत जाण्यासाठी घाबरतात. कुरकुर करतात. पालकांना मोठी कसरत करून आमिष दाखवत त्यांना शाळेत पाठवावे लागतंय. त्यामुळे अशी मुलं अभ्यासातही मागे पडतात. मात्र पालकांना घाबरण्याची गरज नाही आम्ही दिलेल्या टिप्सने तुमचा मुलगा शाळेतही जाईल आणि अभ्यासातही प्रगती करेल.

जर मुलगा शाळेत जायला घाबरत असेल किंवा त्याचं मन अभ्यासात लागत नसेल. तसंच मुलगा शिक्षणापासून दूर पळतोय तर त्याची अनेक कारणं असू शकतात.

तुम्ही त्याच्यावर आभ्यसासाठी जबरदस्ती करत आहात का ? त्यामुळेही मुलगा अभ्यासापासून दूर जातो.

वारंवार दुसऱ्या मुलांसोबत अभ्यासाबाबत त्याची तुलना करत असाल तर तो बिलकुल अभ्यास करणार नाही.

मुलांना खेळण्यासाठी कमी वेळ देता आणि अभ्यासासाठी सांगत असाल तर तो अभ्यासापासून दूर होत जाणार. प्रत्येक वेळी माझा मुलगा अभ्यासच करत नाही असं वार॑वार त्याच्यासमोर दुसऱ्याला बोलत राहिलात तर त्याच्या मनावर शिक्षणाबद्दल तिरस्कार निर्माण होतो.

आम्ही तुम्हाला 5 टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा मुलगा अभ्यासातही हुशार होईल आणि शाळेत जाण्यासाठी कंटाळाही करणार नाही.

संयम बाळगा

प्रत्येक मुलगा हा दुसऱ्या मुलापेक्षा वेगळा असतो. तेव्हा त्याला त्याच्या गतीप्रमानेच शिकू द्या. जर तो त्याच्या कुवतीप्रमाणे अभ्यास करत असेल तर त्याला करू द्या स्वतःवर संयम ठेवा. त्याच्याशी प्रेमाने वागा आणि त्याला अभ्यासात मदत करा.

मदत करा

घरात नेहमी चांगल वातावरण असले पाहिजे स्वतःही काही ना काही वाचत राहिलं पाहिजे. जेव्हा आपण काही वाचत असू आणि मुलाला अभ्यासात काही शंका असल्यास त्याच्या शांखेच निरसन करून त्याला प्रेमाने सांगत विषय हाताळला पाहिजे. त्याच्यावर चिडचिड न करता.

वयानुसार गोल सेट करणं

मुलाचा अभ्यासातला वेग बघून गोल सेट करण्यासोबत त्याची आवड कशात आहे याबाबतही विचार करा. जर मुलाला एखादी गोष्ट शिकायची इच्छा नाही तर थोडा वेळ शांत राहून पुन्हा काही दिवसांनी त्याच्याशी याबाबत बोललं पाहिजे.

Achivement बाबत प्रशंसा करा.

जर मुलाने कोणतीही नवीन गोष्ट शिकला तर त्याला प्रोत्साहित करा. जेणेकरून तो अधिकाधिक नव नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रवृत्त होईल. त्याला प्रोत्साहन द्या. मुलाची स्तुती करा आणि तो क्षण एन्जॉय करा.

निर्णय घेऊ द्यात

मुलांसोबत अभ्यास करतेवेळी त्याचे काही प्रश्न असतील तर ते नीट ऐकून घ्या आणि त्याला स्वतःला निर्णय घेऊ द्या. त्यांना हा आत्मविश्वास द्या की ते शिक्षणाचा प्रवास स्वतः करू शकतात. नवीन नवीन गोष्टी शिकत पुढे जायचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होईल.

आम्ही सांगितलेल्या टिप्स पुरेपूर अंमलात आणल्या तर तुमच्या मुलाला शाळेची गोडीही लागेल. आणि त्याच्या प्रगतीचा ग्राफ वाढतच जाईल यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Travel : स्वर्गाहून सुंदर जगातील 'हे' ठिकाण, आयुष्यात एकदा भेट द्याच

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर कार पुलावरून खाली कोसळली; वाहन अक्षरश: चक्काचूर, दोघांचा मृत्यू

IPL Auction, Priyansh Arya: 6 चेंडूत 6 षटकार मारणारा प्रियांश झाला करोडपती! 30 लाख बेस प्राईज अन् लागली 3.80 कोटींची बोली

Maharashtra News Live Updates: अमित शाहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा होणार?

IPL Auction: अदला -बदली! लाईव्ह ऑक्शनमध्ये MI अन् RCB मध्ये सिक्रेट डिल; Will Jacksला घेताच अंबानींनी थँक यू म्हटलं

SCROLL FOR NEXT