Children Bedtime Routine: सावधान! मुलांच्या झोपेचे वेळापत्रक बनवण्याआधी 'या' गोष्टी लक्षात घ्या, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान
Children Bedtime Routine Saam TV

Bedtime Routine for Children: सावधान! मुलांच्या झोपेचे वेळापत्रक बनवण्याआधी 'या' गोष्टी लक्षात घ्या, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

Tips For Childrens Bedtime Routine: मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी त्यांनी पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आजच तुमच्या मुलाचे झोपेचे वेळापत्रक बनवा.
Published on

Children Bedtime Routine: आजकालच्या अपडेटेड जगात लहान मुलांना लवकरच मोबाईल फोन दिला जातो. त्यामुळे त्यांचा दीर्घकाळ मोबाईलवर गेम्स खेळण्यात, कार्टून पाहण्यात जातो. यामध्ये मुले तहान-भूक देखील विसरतात. तसेच त्यांची झोपही कमी होते आणि डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो. यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात येते.

मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी जेवणासोबतच चांगली झोप घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अपुऱ्या झोपेमुळे लहान मुले चिडचिड करतात. तसेच त्यांना आरोग्याच्या इतर समस्यांना सामोरे जावे लागते. लहान मुलांनी पुरेशी झोप घेतल्यास मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिपूर्ण विकास होतो. चांगली झोप मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवते, निद्रानाश, चिंता यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत करते. मुलांनी झोप पूर्ण घेतल्यास त्यांची सामाजिक आणि आध्यात्मिक प्रक्रिया सुधारते. मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी त्यांच्या झोपेचे वेळापत्रक बनवणे महत्त्वाचे आहे.

Children Bedtime Routine: सावधान! मुलांच्या झोपेचे वेळापत्रक बनवण्याआधी 'या' गोष्टी लक्षात घ्या, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान
Skin Care Tips: ग्लोइंग त्वचा हवी आहे? मात्र 'या' लोकांनी चुकूनही मुलतानी माती चेहऱ्यावर लावू नये

मुलांच्या झोपेची वेळ निश्चित करावी

सर्वप्रथम मुलांच्या दिनचर्येनुसार मुलांनी कधी झोपावे आणि कधी उठावे हा वेळ निश्चित करणे गरजेचे आहे. ठरवलेल्या वेळेनुसार पालकांनी मुलांना झोपवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून मुल हळूहळू स्वतः दररोज त्याच्या नियोजित वेळेवर झोपू लागतील आणि त्यांचे आरोग्य देखील उत्तम राहील. लवकर झोपल्यास सकाळी लवकर उठण्याची मुलांना हळूहळू सवयही लागेल. मुलांच्या झोपेची वेळ निश्चित करताना त्यांच्या वयाचा आणि शरीरयष्टीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक वयात मुलांच्या झोपेच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे पालकांनी मुलांची झोपेची गरज समजून घेऊन त्यांचे झोपेचे वेळापत्रक बनवावे.

वयानुसार लहान मुलांनी किती तास झोपावे?

  • नवजात शिशु - १८ ते २० तास

  • ३ ते ६ महिन्यांचे बाळ - १६ ते १८ तास

  • ६ ते १२ महिन्यांची मुले - १२ ते १६ तास

  • १ ते २ वर्षांची मुले - १२ ते १४ तास

  • ३ ते ४ वर्षांची मुले - ८ ते १४ तास

लहान मुले झोपताना कोणती काळजी घ्यावी?

  • मुलांना रोज रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याची सवय लावा.

  • मुलांना रोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करण्याची सवय लावा.

  • रात्री शरीराला आरामदायक आणि मऊ वाटणारे कपडे घाला.

  • वेळीच मुलांची पाळण्यात झोपण्याची सवय सोडा.

  • मुलांना मऊ गादीवर किंवा पलंगावर झोपवा.

  • रात्री झोपताना मुलांच्या खोलीत लख प्रकाश किंवा जास्त अंधारही नसावा.

  • मुलांच्या झोपण्याच्या खोलीत मंद प्रकाशाचे दिवे लावावेत. जेणेकरून मुलांना गाढ आणि शांत झोप येईल.

  • मुले झोपताना आजूबाजूचा अतिरिक्त आवाज टाळा.

  • आपल्या मुलाला रोज झोपण्यापूर्वी एक मिठी मारा. त्यामुळे मुले न घाबरता शांतपणे झोपी जातात.

  • मुलांना झोपण्यापूर्वी देवाचे स्मरण करायला सांगा.

    टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Children Bedtime Routine: सावधान! मुलांच्या झोपेचे वेळापत्रक बनवण्याआधी 'या' गोष्टी लक्षात घ्या, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान
Evening Workout: कोणत्या वेळी व्यायाम करणं ठरतं फायद्याचं ? सकाळी की संध्याकाळी...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com