Viral video claiming a tiger lifted a forest guard in Chandrapur was AI-generated, confirms forest officials.
Viral video claiming a tiger lifted a forest guard in Chandrapur was AI-generated, confirms forest officials.Saam Tv

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Fact Check: वाघ वनरक्षकाला उचलून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय...या व्हिडिओत वाघ हल्ला करताना स्पष्ट दिसतंय...पण, खरंच वाघाने वनरक्षकावर हल्ला केलाय का...? व्हिडिओत दिसतंय ते सत्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...
Published on

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही...एक व्यक्ती बसलेली असताना हळूच वाघ येतो...आणि काही कळायच्या आतच वाघाने माणसाला उचलून नेलंय...आता हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहा...काही कळायच्या आतच वाघाने माणसाला तोंडात पकडून उचलून नेलंय...हा व्हिडिओ चंद्रपुरातील ब्रम्हपुरीमधील असल्याचा दावा करण्यात आलाय...वनरक्षकावर हल्ला केल्याचा दावा करण्यात आलाय...यामुळे खळबळ उडालीय...पण, खरंच अशी घटना घडलीय का...?

हा व्हिडिओ चंद्रपुरातील असल्याचा दावा केल्याने भीतीचं वातावरण पसरलंय...काही दिवसांपूर्वी नाशिक, पुणे, नगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना समोर आल्या...त्यामुळे या व्हिडिओ सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने थेट चंद्रपुरातील वनअधिकाऱ्यांची भेट घेतली...आणि ही घटना खरंच घडलीय का...?

चंद्रपुरात वाघाने वनकर्मचाऱ्यावर हल्ला केलेला नाही

व्हायरल व्हिडिओ AIच्या माध्यमातून बनवलाय

व्हिडिओ तयार करणाऱ्याचा शोध घेतला जातोय

व्हिडिओ बनवणाऱ्यावर फौजदारी कारवाई करणार

हा व्हिडिओ खोटा असून, बनवण्यात आलाय...त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण करणारा व्हिडिओ बनवणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे...पोलीस आता त्याचा शोधही घेतायत...त्यामुळे असे व्हिडिओ आल्यास तुम्ही घाबरून जाऊ नका...आधी शहानिशा करा...आमच्या पडताळणीत वाघाने वनरक्षकाला उचलून नेल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com