Shocking Video : शाळेत वर्ग सुरु असताना अचानक कोसळली भिंत ! संपूर्ण घटना CCTVत कैद

Shocking Incident : गुजरात येथे असलेल्या बडोद्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. जिथे शाळा सुरु असताना अचानक भिंत कोसळली आहे.
Shocking Incident
Shocking VideoSaam Tv
Published On

सध्या महाराष्ट्रासह सर्वत्र मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली आहे. परिणामी अनेक ठिकाणी नद्यांना पुर तर अनेक सखल भागात पाणी साचण्याच्या घटना दिसतात शिवाय काही विभागात सततच्या पावसाने इमारतीचे भाग कोसळण्याच्याही धक्कादायक घटना घडत आहे, अशीच एक धक्कदायक घटना गुजरातमधील एका शाळेत घडली ,जिथे एका शाळा सुरु असताना अचानक भिंत कोसळली आहे. सर्व घटना वर्गात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पंरतू या घटनेत सुदैवानं कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झालेली नाही.

Shocking Incident
Sassoon Hospital Shocking Incident: 'ससून'मधून आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नचर चुकवून सुरू होता भयंकर प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वडोदरा शहरात ही धक्कादायक घटना शुक्रवार १९ जुलै २०२४ रोजी घडली. वडोदरा शहरात वाधोडिया रोडवर श्री नारायण गुरुकुल ही शाळा आहे. शुक्रवारी शाळा (school)सुरु असताना साधारण १२.३० वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांची जेवणाची सुट्टी झाली होती त्या दरम्यान अचानक भिंत कोसळली. ही वर्गखोली पहिल्या मजल्यावर होती.

व्हायरल होत असलेल्या सीसीव्हीमध्ये दिसते की, मधली सुट्टी असल्याने विद्यार्थी संपूर्ण वर्गातील बाकावर बसलेले होते. दरम्यान विद्यार्थ्यांना काही कळण्याच्या आधीच वर्गातील एक भिंत अचानक कोसळते. दरम्यान भिंत कोसळताच सर्व विद्यार्थी घाबरलेले दिसत आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी तेथून पळ काढतात. भिंत ज्याक्षणी कोसळते तेव्हा तेथे पडणाऱ्या बाकावर काही विद्यार्थी जेवताना दिसत आहे. मात्र ते विद्यार्थ्यी (student)पटकन तेथून पळ काढतात.

शाळेच्या मुख्याध्यापिकाच्या म्हणण्यानुसार, ज्या वेळेस भिंत कोसळण्याचा आवाज आला त्यावेळी आम्ही घटनास्थळी गेलो. या घटनेत एका विद्यार्थ्याच्या डोक्याला काहीशी दुखापत झालेली आहे. घटनेनंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षिक स्थळी पाठवले.शिवाय याची माहिती आम्ही अग्निशमन दलास सांगितली. यात घटनेत संपूर्ण भिंतही पार्किंगच्या जागेवर कोसळल्याने विद्यार्थ्यांच्या काही सायकले नुकसान झाले मात्र अग्निशमन दल घटनास्थळी (scene)आल्यानंतर बचाव कार्यास तात्काळ सुरुवात झाली'.

Shocking Incident
Bhushi Dam Incident: भुशी धरण दुर्घटना दुर्दैवी, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; राज्य सरकारची घोषणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com