Chanakya Niti On Relationship  Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Relationship : तुमच्या जोडीदारामध्ये आहेत का हे गुण ? असतील तर लगेच लग्नासाठी तयार व्हा !

How To Choose Partner : तारुण्य हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा काळ असल्याचे सांगितले आहे.

कोमल दामुद्रे

Relationship Tips : कॉलेज किंवा ऑफिसमध्ये तारुण्य वयात अनेकांच प्रेम जडतं परंतु, लग्न करायची वेळ आली अनेकजण या गोष्टीवर विचार करत बसतात. लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वपूर्ण निर्णय आहे. जो कधीही घाई करुन घेऊ नये.

सुखी वैवाहिक जीवनासाठी चांगल्या जोडीदाराची गरज असते. जोडीदार चांगला मिळाला तर आयुष्य आनंदाने आणि आरामात जाते. आचार्य चाणक्य म्हणतात की, तारुण्य हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा काळ असल्याचे सांगितले आहे.

चाणक्यांच्या (Chanakya) मते, लग्नापूर्वी जीवन साथीदाराची निवड करणे खूप महत्त्वाचे असते. लग्नानंतर योग्य निवड पती आणि कुटुंबाचे जीवन आनंदाने भरते. आज या लेखात आपण चाणक्याच्या या गुणांबद्दल बोलत आहोत. जे तुम्ही तुमच्या जोडीदारात (Partner) दिसले पाहिजे आणि त्यांना तुमचा जीवनसाथी बनवण्यास उशीर करू नये.

1. धर्माचे पालन करणारी

धर्माच्या कार्याशी निगडीत असलेल्या स्त्रीला योग्य आणि अयोग्य यातील फरक चांगलाच ठाऊक असतो. योग्य आणि अयोग्य यातील फरक समजणारी स्त्री कुटुंबासह समाजाला योग्य मार्ग दाखवण्यास मदत करते. धर्माला मानणारी स्त्री (Women) घरातील शांतता आणि सुख कधीच भंग होऊ देत नाही. ती तिच्या मुलांमध्ये धार्मिक गुणही रुजवते. ज्यामुळे चांगला व्यक्ती निर्माण होण्यास मदत होते.

2. राग

रागावर नियंत्रण ठेवणे केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही आले पाहिजे. राग ही आपल्यातील एक भावना आहे, जी कोणत्याही नात्याला क्षणात तोडते. रागावर नियंत्रण न ठेवल्यामुळे अनेक मोठी साम्राज्ये उद्ध्वस्त झाली याचा इतिहासही साक्षी आहे. स्त्री आणि पुरुष दोघांनाही आपल्या रागावर नियंत्रण कसे ठेवायचे हे माहित असले पाहिजे. असे केल्याने आयुष्य आनंदाने घालवता येते.

3. विश्वास

लग्नानंतर जी महिला व पुरुष आपल्या जोडीदाराशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीकडे पाहात नाही त्याला खरा जोडीदार मानले जाते. अशा महिला कधीच मर्यादा ओलाडंत नाही. लग्नानंतर प्रत्येक सुख-दु:खात ती पतीच्या पाठीशी उभी असते. चाणक्य सांगतात की, जीवन साथीदाराच्या वागणुकीवरून तो खरा आणि चांगला आहे हे कळू शकते.

4. समाधानकारी

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग असतो. दुसरीकडे, ज्या स्त्रियांना लोभाची भावना नसते त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी होते. त्याचबरोबर चाणक्य सांगतात की ज्या स्त्रियांना समाधानी राहण्याची सवय आहे, त्यांना आपला जीवनसाथी बनवायलाच हवा. आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीत संतुलन राखून त्या महिला आपल्या इच्छा पूर्ण करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

SCROLL FOR NEXT