Chanakya Niti On Youngster : तारुण्यात या 3 गोष्टींपासून राहा दूर, उतार वयात राहाल सुखी...

Parenting Tips : आपण दिलेले संस्कारही योग्य आहेत ना असे अनेक प्रश्न पालकांना असतात.
Chanakya Niti On Youngster
Chanakya Niti On YoungsterSaam tv
Published On

Chanakya Niti On Youth : मुल वयात आल्यानंतर पालकांना चिंता वाटू लागते. आपला मुलगा योग्य वळणावर आहे की, नाही. आपण दिलेले संस्कारही योग्य आहेत ना असे अनेक प्रश्न पालकांना असतात. चाणक्य म्हणतात की, एक चांगला, हुशार तरुण देशाची प्रगती घडवू शकतो.

युवा पिढी ही देशाचे भविष्य असते. त्यांना दाखवलेली दिशा हे देशाचे भविष्य घडवण्यात महत्त्वाचा वाटा उचलते. जर हे लोक योग्य वळणावर नसतील तर यांचे भविष्य खराब व्हायला वेळ लागणार नाही. चाणक्य म्हणतात की, तारुण्यात या ३ गोष्टींपासून वेळीच दूर राहिले तर म्हातारवयात ते अधिक सुखी असतील जाणून घेऊया त्याबद्दल

Chanakya Niti On Youngster
Chanakya Niti About House : या 5 जागेवर घर बनवूच नका ! आयुष्य होईल उद्धवस्त, चाणक्यांनी दिला सल्ला

1. चुकीची संगत

आपल्या आजुबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात वादळ येऊ शकते. आपण शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमध्ये (Office) असे अनेक माणसं असतात ज्यांची संगत चुकीची असते. ते आपल्याला बरेचदा चुकीच्या मार्गाला लावतात. त्यामुळे आपल्या ध्येयात अनेक अडचणी (Problem) येतात. अपयश मिळते. आपण त्यांच्यात इतके गुंतत जातो की, चांगल्या वाईट गोष्टीची देखील आपल्याला जाण नसते. चाणक्य म्हणतात की, जो तरुणपणात या गोष्टींपासून दूर राहतो, त्याचे म्हातारपणही आनंदाने जाते.

Chanakya Niti On Youngster
Weekly Rashibhavishy In Marathi : मिथुन-कन्याच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी तर कुंभने बाळगा सावधगिरी ! जाणून घ्या कसा असेल येणारा आठवडा

2. आळस

तारुण्यात मेहनत केली तर म्हातारपण चांगलं असतं असं म्हणतात. हे असे वय आहे जिथे आळस माणसाचा शत्रू मानला जातो. माणसाला प्रगती करण्यापासून रोखतो, जो त्यावर मात करतो, त्याला यशस्वी (Success) होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ज्याला तारुण्यात वेळेची किंमत कळते, त्याचे भविष्य कधीच दुःखाने संपत नाही. आळशी माणसाला ज्ञान मिळत नाही आणि ज्ञानाशिवाय पैसा मिळत नाही. पैशाशिवाय जीवन संघर्षातच जाते.

3. राग

रागाने काम होत नाही, बिघडते. चाणक्य म्हणतात की, तारुण्यात रक्त उसळते ही सामान्य गोष्ट आहे, परंतु जो त्यावर मात करतो त्याला प्रगतीचा मार्ग सुकर होतो. क्रोधाने बुद्धी भ्रष्ट होते. हे असे विष आहे जे माणसाला हळूहळू पोकळ बनवते. जर तुमच्या सोबत असेल तर तुमच्या स्वतःचे काय, अनोळखी लोक सुद्धा अंतर ठेवतात आणि शत्रू याचा फायदा घेतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com