Chanakya Niti About House : या 5 जागेवर घर बनवूच नका ! आयुष्य होईल उद्धवस्त, चाणक्यांनी दिला सल्ला

How To Build House : आपण अनेकदा घर घेताना चुका करतो. ज्यामुळे पुढे जाऊन आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते.
Chanakya Niti About House
Chanakya Niti About HouseSaam Tv
Published On

Home Buying Tips : मुंबईसारख्या शहरात घर घेणे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न आहे. आपलेही घर असावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु, आपण अनेकदा घर घेताना चुका करतो. ज्यामुळे पुढे जाऊन आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते.

आचार्य चाणक्य म्हणतात की, घर विकत घेताना व घर बांधताना काही विशेष गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. ते म्हणतात मनुष्य या ठिकाणी घर घेऊन देखील नये व बांधून देखील नये. जाणून घेऊया ते कोणते ठिकाण आहे व चाणक्य असे का म्हणाले...

Chanakya Niti About House
Chanakya Niti On Rich People : अशी देहबोली असणारेच होतात करोडपती, श्रीमंत होण्यासाठी तुमच्यात आहेत का हे गुण?

1. आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, जिथे उदरनिर्वाहाचे साधन मिळत नाही अशा ठिकाणी चुकूनही घर (Home) बांधू नये. अन्यथा आयुष्यभर (Life) अडचणींचा सामना करावा लागतो. स्थिर होण्यासाठी नेहमी अशी जागा निवडली पाहिजे, जिथे उपजीविकेचे अनेक स्त्रोत आहेत.

2. आचार्य चाणक्य यांच्या मते, अशा ठिकाणी घर बांधू नये, जेथे लोकांच्या लज्जेची भीती नसेल. जिथे सामाजिक जाण आधी असते, तिथेच स्थायिक होणे उत्तम मानले जाते.

Chanakya Niti About House
Prarthana Behere : कपाळी चंद्रकोर, केसात गजरा, प्रार्थानाच्या साडीवर साऱ्यांच्या नजरा...

3. आचार्य चाणक्य सांगतात की, घर अशा ठिकाणी वसवले पाहिजे, जिथे परोपकारी लोक राहतात आणि त्यांच्यात त्यागाची भावना असते. अशा ठिकाणी घर उभारल्याने तुमच्यातही परोपकाराची भावना निर्माण होते.

4. कायद्याचा (Law) धाक नसलेल्या ठिकाणी स्थायिक होण्यापासून नेहमी दूर राहिले पाहिजे. त्याऐवजी, अशी जागा निवडा जिथे लोक कायदा आणि सुव्यवस्थेचे पूर्णपणे पालन करतात.

Chanakya Niti About House
Namrata Pradhan : मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच !

5. घर नेहमी अशा ठिकाणी असले पाहिजे, जिथे लोक दान करत राहतात. हिंदू धर्मात दान करणे हे अत्यंत पुण्यपूर्ण कार्य मानले जाते. त्यामुळे मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com