Brinjal Benefits SAAM TV
लाईफस्टाईल

Brinjal Benefits : नावडती वांग्याची भाजी आरोग्यासाठी एकदम बेस्ट! फायदे वाचून थक्क व्हाल

Health Care Tips : वांगी ही अनेकांची नावडती भाजी आहे. कारण त्याची चव बहुतेकांना आवडत नाही. पण वांगी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आजाराशी लढण्यासाठी तुम्हाला मदत करतात.

Shreya Maskar

अनेकांच्या घरात वांग्याची भाजी केली जाते. पण वांगी नाव काढताच अनेकांची नाक मुरडली जातात. अशावेळी आपण भरली वांगी, वांग्याचे काप, वांग्याचे भरीत असे वांग्याचे विविध पदार्थ करतो. पण कमी तेल-मसाल्याची पौष्टिक वांग्याची भाजी खाणे चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे.

वांगी ही भाजी अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. वांग्यामध्ये व्हिटॅमिन्स, फायबर, मॅग्नेशियमसोबत इतर महत्वाचे घटक असतात. पावसात होणाऱ्या अनेक आजारांवर वांगी गुणकारी ठरतात. वांग्याचे नियमित सेवन केल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

वजन नियंत्रणात

वांगीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे वजन आणि कोलेस्ट्रॉल कमी राहण्यास मदत मिळते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी वांगी रामबाण उपाय आहे. वांग्याच्या सेवनामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

कॅन्सर

वांग्यामधील सोलासिड मोनोसिल ग्लाइकोसाइड्स नावाचा घटक कॅन्सरच्या पेशींविरोधात लढण्यास मदत करतो.

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित वांगी खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. तसचे आपले पचनक्रिया देखील सुरळीत होते. कारण वांग्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे. टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांनी आपल्या आहारात वांगीचा समावेश आवर्जून करावा. कारण वांग्यामुळे इन्शुलिन नियंत्रित राहण्यास मदत होते.

हृदयाचे आरोग्य

वांग्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म शरीराचे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करतात. शरीरातील पेशींचे प्रमाण कमी झाले असेल तर वांग्याची भाजी खावी. वांग्याच्या भाजीमुळे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. यामुळे आपले हृदय निरोगी राहते. हृदयविकारांचा धोका कमी होतो.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT