Rohini Gudaghe
कढईमध्ये जीरे, खोबरे भिजून घ्या. नंतर तीळ, लसूण,आलं, कोथिंबीर घालून परतवा.
त्यात भाजलेले शेंगदाणे घालून पाणी न चालता वाटून घ्या.
वाटलेल्या मिश्रणात कांदा, टोमॅटो, तिळ, तिखट, हळद, गोडा मसाला, बेसन, मीठ, कोथिंबीर आणि दोन चमचे शेंगदाणे तेल घाला.
वांग्याचे काटे काढून चिरा पाडून मसाला भरून घ्या.
कढईत तेल गरम करून त्यात मसाला चांगला भाजून घ्या. नंतर टोमॅटो घालून परतवा.
गूळाचा खडा टाकून वांगी आणि मसाला मिक्स करा.
मंद आचेवर वांगी 10 ते 15 मिनिटे शिजू द्या.