Health Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Health Tips : तोंड उघडताच येतो वास? 'या' पदार्थांचे करा सेवन दुर्गंधी जाईल दूर

Home Remedy For Bad Breath : दिवसभरात आपण असंख्य पदार्थांचा आस्वाद घेतो. यामुळे तोंडात अन्नाचे कण राहतात. ज्यामुळे काही वेळा तोंड उघडताच वास येतो. दुर्गंध मिटवण्यासाठी घरगुती रामबाण उपाय बेस्ट ठरतात.

Shreya Maskar

तोंडाचा वास येणे ही सामान्य गोष्ट असली तरी चारचौघात वावरताना लाज वाटते. तोंडाला वास येऊ नये म्हणून दातांची आणि तोंडाची स्वच्छता करणे खूप महत्त्वाचे असते. यामुळे तोंडाचेल आरोग्य निरोगी राहते आणि तोंडाला दुर्गंधी येत नाही. खाण्या-पिण्याच्या पदार्थ दातांमध्ये अडकतात आणि दीर्घकाळ ते तसेच राहिल्यास तोंडाला दुर्गंधी येते. तसेच अन्नाचे कण दातात अडकून राहिल्यास बॅक्टेरियाचा धोका वाढतो. त्यामुळे श्वासाची दुर्गंधी येते.

दही

तोंडातून वास येत असल्यास तुम्ही दोन चमचे दही खाऊ शकता. दह्यामुळे तोंडाला एक नवीन चव मिळेल. श्वासाची दुर्गंधी कमी करण्यास मदत होईल. दह्यामधील गुणधर्म आतड्यातील बॅक्टेरिया संतुलित राहण्यास मदत करतात. दह्यामध्ये साखर आणि मीठ न टाकता त्याचे सेवन करावे.

पाणी प्या

वारंवार तोंडाला वास येऊ नये म्हणून शरीर हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे रोज नियमित ३ लिटर पाणी प्यावे. पाण्याच्या कमतरतेमुळे तोंड कोरडे होते आणि बॅक्टेरिया वाढतात. यामुळे तोंडाला दुर्गंधी येते.

संत्री

फळ खाणे कधीही आरोग्यासाठी चांगले राहते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. तोंडात लाळेचे प्रमाण कमी झाल्यास तोंड उघडताच वास येतो. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी तोंडात लाळेचं प्रमाण वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे श्वासाची दुर्गंधी कमी होते. तसेच पिवळ्या दातांसाठी देखील संत्री उपयुक्त ठरतात.

चॉकलेट

अनेक वेळा जेवताना कांदा आणि लसूण खाल्ल्यामुळे तोंडाला वास येतो. अशात चारचौघात जायला लाज वाटते. अशावेळी नियमित बडीशेप, चॉकलेट खाल्ल्यामुळे तोंडाचा दुर्गंधी कमी होतो आणि चवही बदलते.

तोंडाची स्वच्छता

तोंडाच्या चांगल्या आरोग्यासाठी तोंडाची सकाळी आणि रात्री नियमित स्वच्छता करणे गरजेचे असते. यामुळे रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करावे. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया दूर होतात. तसेच तु्म्ही अँटिबॅक्टेरियल माउथवॉशचा देखील वापर करू शकता.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT