Diabetes Tips : 'ही' फ्रोजन भाजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक; आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Frozen Peas Side Effects : सध्या मोठ्या प्रमाणात फ्रोजन फूडचे सेवन केले जाते. मात्र मधुमेहाच्या लोकांनी फ्रोजन फूड खाताना आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.कारण फ्रोजन मटार खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
Frozen Peas Side Effects
Diabetes TipsSAAM TV
Published On

धावपळीच्या जगात जेवणासाठी अनेक शॉर्टकट वापरले जातात. त्यातील एक शॉर्टकट म्हणजे फ्रोजन फूड होय. ऑफिसला जाताना घाई होऊ नये म्हणून अनेक महिला फ्रोजन पदार्थांचा वापर करतात. त्यामध्ये भाजी, फळे, कडधान्य मोठ्या प्रमाणात येतात. मटार अनेकांना खायला आवडतात. पण मटारची स्वच्छता करताना खूप वेळ लागतो. यामुळे लोक फ्रोजन मटार खातात. फ्रिजमध्ये गोठवलेले फ्रोजन मटार अनेक आजारांना आमंत्रण देते.

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांनी फ्रोजन मटार खाणे टाळा. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचे प्रमाण असते. याचे अतिसेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. कारण फ्रोजन मटार ताजा राहण्यासाठी तसेच त्याची चव टिकण्यासाठी त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह मोठ्या प्रमाणात टाकले जातात. जे आरोग्यास घातक ठरतात. फ्रोझन मटारमध्ये स्टार्टचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

वजन वाढते

फ्रोझन मटारमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे यांचे सेवन टाळा. मटार मधील स्टार्च शरीरातील अतिरिक्त चरबी वाढवतो. यामुळे शरीराला लठ्ठपणा येतो.

Frozen Peas Side Effects
Health Tips : ब्राऊन ब्रेड की व्हाईट? आरोग्याला उत्तम काय? वाचा तज्ज्ञांचे मत

हाय ब्लड प्रेशर

फ्रोजन मटारमुळे हाय ब्लड प्रेशर ची समस्या निर्माण होऊ शकते. कारण यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बीपी समस्या उद्भवते. फ्रोजन मटार मध्ये जास्त प्रमाणात फॅट असते त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढून हृदयविकाराचा धोका वाढतो.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Frozen Peas Side Effects
Pregnancy Health Tips : गरोदर महिलेनं दररोज 'हे' पदार्थ खावेत; बाळ होईल चलाख अन् चपळ!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com