Pregnant Women Diet
Pregnancy Health TipsSaam TV

Pregnancy Health Tips : गरोदर महिलेनं दररोज 'हे' पदार्थ खावेत; बाळ होईल चलाख अन् चपळ!

Pregnant Women Diet : आई जे काही पदार्थ खाते त्याचा थेट परिणाम बाळाच्या बुद्धीवर सुद्धा होतो. बाळ बुद्धिमान असावं असं तुम्हालाही वाटत असेल तर आजपासून आहारात या पदार्थांचा समावेश करण्यास सुरुवात करा.
Published on

प्रत्येक गरोदर महिलेला आपलं बाळ सुदृढ आणि नरोगी रहावं असं वाटतं. त्यासाठी महिला बाळ पोटात आहे तेव्हापासूनच त्यावर गर्भ संस्कार करण्यास सुरुवात करतात. गर्भ संस्कारासह बाळाच्या बुद्धीचा विकास व्हावा यासाठी आयोडीन युक्त पदार्थ आईने खाणे महत्वाचे असते. कारण आई जे काही पदार्थ खाते त्याचा थेट परिणाम बाळाच्या बुद्धीवर सुद्धा होतो. बाळ बुद्धिमान असावं असं तुम्हालाही वाटत असेल तर आजपासून आहारात या पदार्थांचा समावेश करण्यास सुरुवात करा.

Pregnant Women Diet
Women Prisoners Pregnant: महिला कैदी तुरुंगातच होतायत गर्भवती; उच्च न्यायालयातील अहवालामुळे खळबळ

फोर्टिफाइड आयोडीन मीठ

शरीरातील आयोडीनचं प्रमाण वाढवण्यासाठी तुम्हाला आयोडीनचे सेवन करावे लागेल. त्यासाठी जेवण बनवताना पदार्थांमध्ये साधं मीठ वापरू नका. त्याऐवजी जेवणात आयोडीन फोर्टिफाइड आयोडीन मीठाचा वापर करा. कारण मीठात जास्त आयोडीन आणि फोर्टिफाइड मिनरल्स असते. याने गरोदर महिलेला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

जास्तीत जास्त डेअरी प्रोडक्टचे सेवन

मुलाच्या बुद्धीसाठी आयोडीन खूप महत्वाचे आहे. त्यामुळे गरोदर असताना प्रत्येक महिलेने दूध, दही आणि चीज अशा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन आवश्य केले पाहिजे. त्याने बाळाला जास्तीत जास्त प्रमाणात आयोडीन मिळते आणि चिमुकल्याचे आरोग्य निरोगी राहते.

अंडी

अंड्यांचे सेवन केल्यास त्यातूनही मुबलक प्रमाणात आयोडीन मिळते. एक अंडे खाल्ले तर त्यातून आपल्याला १६ टक्के आयोडीन मिळतं.

फरशीच्या शेंगा

फरसबी ही भाजी बाजारात सहज उपलब्ध होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही भाजी घरच्याघरी बनवून खाऊ शकता. फारशीची भाजी खाल्ल्याने गरोदर महिलेचं आरोग्य सुदृढ राहतं. शिवाय त्यातील आयोडीनमुळे बाळाच्या बुद्धीचा विकास होतो.

Pregnant Women Diet
Bihar Pregnant Woman News: २० दिवसांनी आई होणार होती पण त्याआधीच.. पतीचा चेहरा पाहताच पत्नीने सोडला जीव; काय आहे प्रकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com