Women Prisoners Pregnant: महिला कैदी तुरुंगातच होतायत गर्भवती; उच्च न्यायालयातील अहवालामुळे खळबळ

Women Prisoners Getting Pregnant: तुरुंगातील महिला कैदी मोठ्या प्रमाणात गर्भवती होत असून आतापर्यंत तुरुंगात १९६ मुलांचा जन्म झाला आहे, असा दावा ॲमिकस क्युरीने गुरुवारी (८ फेब्रुवारी) कोलकाता उच्च न्यायालयात केला.
Women Prisoners Getting Pregnant
Women Prisoners Getting PregnantSaam TV
Published On

Women Prisoners Pregnancy Case

तुरुंगातील महिला कैदी मोठ्या प्रमाणात गर्भवती होत असून आतापर्यंत तुरुंगात १९६ मुलांचा जन्म झाला आहे, असा दावा ॲमिकस क्युरीने गुरुवारी (८ फेब्रुवारी) कोलकाता उच्च न्यायालयात केला. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली. हा मुद्दा अत्यंत गंभीर असल्याचं म्हणत कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Women Prisoners Getting Pregnant
Nanded News: भरधाव कार पुलावरून खाली कोसळली; भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, नांदेड जिल्ह्यातील घटना

तुरुंगातील महिला कैद्यांना (Women Prisoners) कोण गर्भवती करतंय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, असे आदेशच सरन्यायाधीश टीएस शिवग्ननम आणि न्यायमूर्ती सुप्रतीम भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सुनावणी सोमवारपासून सुरू होईल, असंही कोर्टाने स्पष्ट केलंय.

1 जानेवारी 2024 च्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये असलेल्या 60 वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये सुमारे 26 हजार महिला कैदी बंद आहेत. यातील 448 महिलांवर आरोप सिद्ध झाले असून 174 महिलांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.  (Latest Marathi News)

नुकतेच राज्यातील सर्व सुधारगृहाचे न्याय मित्र (एमिकस क्युरी ) यांनी कोलकाता उच्च न्यायालयात एक अहवाल सादर केला. यात महिला तुरुंगात महिला कैद्यांचं गर्भवती होण्याचं प्रमाण वाढलंय, अशी बाब त्यांच्या लक्षात आली.

कारागृहात असताना महिला गरोदर होत असून आतापर्यंत १९६ मुलांचा जन्म झाल्याचं ॲमिकस क्युरीच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने हे प्रकरण अहवालासहित न्यायाधीश टीएस शिवगणनम आणि न्यायाधीश सुप्रतिम भट्टाचार्यच्या यांच्या खंडपीठासमोर मांडलं.

इतकंच नाही, तर सुधारगृहातील पुरुष कर्मचाऱ्यांना महिला कैद्यांना ठेवलेल्या परिसरात प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी खंडपीठासमोर केली. दरम्यान, खंडपीठाने देखील ॲमिकस क्युरी यांनी मांडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.

Women Prisoners Getting Pregnant
Buldhana Bus Accident: एसटी-बस ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात एकाचा मृत्यू, १५ प्रवासी जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com