Health Tips : ब्राऊन ब्रेड की व्हाईट? आरोग्याला उत्तम काय? वाचा तज्ज्ञांचे मत

White vs Brown Bread : सकाळच्या नाश्त्याला मोठ्या प्रमाणात ब्रेड खाल्ला जातो. यामध्ये ब्राऊन ब्रेड आणि व्हाईट ब्रेड यांचा समावेश असतो. या दोन्ही ब्रेड मधील फरक जाणून घेऊन चांगल्या आरोग्यासाठी योग्य ब्रेडची निवड करा.
White vs Brown Bread
Health TipsSAAM TV
Published On

सध्या बरेच लोक नाश्त्याला ब्रेड जाम, ब्रेड बॅटर आणि सँडविच असे ब्रेडचे पदार्थ खातात. कारण हे झटपट बनवून होतात. ब्रेडमुळे पोट देखील दीर्घकाळ भरलेले राहते. मात्र आजकाल बाजारात विविध प्रकारचे ब्रेड उपलब्ध आहेत. यातील आरोग्यासाठी उत्तम ब्रेड कोणता आज जाणून घेऊयात.

बाजारात ब्राऊन ब्रेड आणि व्हाईट ब्रेड मिळतात. पण यातील कोणता ब्रेड आरोग्याला जास्त फायदे देतो तर कोणता शरीराचे नुकसान करतो पाहूया.

व्हाईट ब्रेड

व्हाईट ब्रेडमध्ये कमी कॅलरी असल्यामुळे झटपट वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असतो. पण त्यात वापरले जाणारे पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरतात. व्हाईट ब्रेड मैद्यापासून तयार केला जात असल्यामुळे पचनक्रियेत अडथळे निमार्ण होतात. व्हाईट ब्रेडची चव आणि रंग उत्तम येण्यासाठी त्यात अनेक कॉर्न स्टार्च आणि इतर अनेक पदार्थ मिसळलेले असतात. जे आरोग्यासाठी घातक मानले जातात. यीस्टचा वापर होत असल्यामुळे आतड्यात चांगले बॅक्टेरिया वाढतात. व्हाईट ब्रेड बनवण्यासाठी त्यावर अनेक प्रक्रिया केल्या जातात. ज्यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात. ब्रेडच्या रंगावर न जाता त्यातून मिळणाऱ्या पोषक घटकांवर लक्षकेंद्रित करणे गरजेचे आहे. कारण व्हाईट ब्रेडचा रंग अधिक चमकदार करण्यासाठी त्यात कृत्रिम रंग वापरले जातात. जे आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात.

White vs Brown Bread
Diabetes Control : मधुमेहावर घरच्या घरी नियंत्रण आणा, 'या' डाळीचे सेवन संजीवनी बूटीचे काम करेल

ब्राऊन ब्रेड

ब्राऊन ब्रेड हा गहू आणि इतर धान्यांपासून बनवला जातो. जे आरोग्यास फायदेशीर आहे. यात फायबर, कार्बोहाइड्रेट यांचे प्रमाण जास्त असते. जे खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुरळीत होते. अपचनाचा त्रास होत नाही. ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे. त्या लोकांसाठी ब्राऊन ब्रेड उत्तम आहे. यामध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते. ब्राऊन ब्रेड खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे भूक कमी लागते. नियमित नाश्त्याला ब्राऊन ब्रेड खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून हृदयाचे आरोग्य चांगले राहते. ब्राऊन ब्रेड कधीही खरेदी करताना चांगल्या दुकानातून खरेदी करावा. कारण फिटनेससाठी ब्राऊन ब्रेड उत्तम असल्यामुळे बाजारात विविध दर्जाचे ब्राऊन ब्रेड उपलब्ध आहेत.ज्याच्या सेवनामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते. यामुळे चांगल्या ब्रँडचा ब्राऊन ब्रेड विकत घ्यावा.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

White vs Brown Bread
Health Tips : कोणते कॉम्बिनेशन आरोग्यासाठी बेस्ट, दही-साखर की दही-मीठ? वाचा तज्ज्ञांचे मत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com