Corn Cheese Recipe: पावसाळ्यात चटकदार खाण्याची इच्छा होतेय? तर १० मिनिटांत बनवा कॉर्न चीज बॉल; वाचा सोपी रेसिपी

Corn Cheese Recipe in Marathi: पावसात बनवता येतील अशा चटपटीत पदार्थांची रेसिपी जाणून घ्या..
Corn Recipes
Monsoon Corn RecipesSAAM TV
Published On

पाऊस म्हटला की, गरमागरम पदार्थांची मेजवानी होते. पावसाच्या थंडगार वातावरणात चटपटीत पदार्थ खायला सर्वांना आवडतात. पण अनेकदा कांदा आणि बटाट्याचे भजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे या पावसात तुम्ही मक्यापासून खुसखुशीत -खमंग पदार्थ बनवा आणि पावसाचा आनंद लुटा. यामुळे तुमच्या जिभेला नवीन चव मिळेल आणि आरोग्य देखील हेल्दी राहील.

चला तर मग जाणून घेऊयात मक्याच्या ३ चटपटीत पदार्थांची रेसिपी..

मक्याची खुसखुशीत करंजी

मक्याची करंजी बनवण्यासाठी उकडलेले मक्याचे दाणे, मूग डाळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, सुके खोबरे, लिंबाचा रस, मीठ, साखर, तूप, मैदा इत्यादी साहित्य लागते.

कृती

मक्याची करंजी बनवायला अगदी सोपी आहे. सर्वप्रथम तूप घालून मैद्याची कणीक मळून घ्यावी. त्यानंतर मक्याचे उकडलेले दाणे, भिजलेली डाळ आणि हिरवी मिरची बारीक वाटून घ्यावी. एका भांड्यामध्ये तेल, हळद, हिंग, मोहरी आणि चवीनुसार मीठ आणि साखर घालून मिश्रण छान एकत्र करून घ्यावे. हे सारण थंड झाल्यावर त्यामध्ये सुक खोबर, लिंबाचा रस, कोथिंबीर घालावी. त्यानंतर मैद्याच्या पिठाची पारी करून त्यात हे सारण भरावे आणि तेलात मंद आचेवर करंज्या तळून घ्या. अशाप्रकारे तुमची खुसखुशीत करंजी तयार झाली.

चटपटीत चीज कॉर्न बॉल

चटपटीत चीज कॉर्न बॉल बनवण्यासाठी उकडलेले मक्याचे दाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, ब्रेड क्रम्ब, चीज, तेल, लसूण इत्यादी साहित्य लागते.

कृती

सर्वप्रथम उकडलेले मक्याचे दाणे बारीक करून घ्यावे. त्यामध्ये उकडलेला बटाट, ब्रेड क्रम्ब , हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण छान एकत्र करून घ्यावे. त्यानंतर मक्याच्या मिश्रणाची पारी करून त्यात छोटा चीजचा तुकडा घालावा आणि गोलाकार बॉल करून घ्यावे. हे बॉल ब्रेड क्रम्बमध्ये घोळवून तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यावे. हिरव्या चटणीसोबत तुम्ही चीज कॉर्न बॉलचा आस्वाद घेऊ शकता.

Corn Recipes
Monsoon Energy Drinks : पावसाळ्यात हे एकदा ट्राय करून बघा! चहा-कॉफीला कराल टाटा, बाय-बाय!

कुरकुरीत मक्याचे भजी

कुरकुरीत मक्याचे भजी तयार करण्यासाठी उकडलेले मक्याचे दाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, डाळीचे पीठ, आलं लसूण पेस्ट, जिरे पावडर, चाट मसाला, हळद, तिखट, मीठ इत्यादी साहित्य लागते.

कृती

सर्वप्रथम उकडलेले मक्याचे दाणे हिरवी मिरची घालून जाडसर वाटून घ्यावे. त्यानंतर एका भांड्यामध्ये वाटलेले सारण, कोथिंबीर , डाळीचे पीठ, आलं लसूण पेस्ट, जिरे पावडर, चाटमसाला, हळद, तिखट, मीठ घालून छान एकत्र करून घ्यावे. त्यानंतर गरम तेलामध्ये या सारणाचे छोटे गोळे करून भजी तळून घ्यावे.

Corn Recipes
Medu Vada Recipe: कुरकुरीत आणि टेस्टी; नाश्त्याला बनवा टम्म फुगलेला मेदूवडा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com