गोड आणि क्रीमी केक सर्वांनाच आवडतो. लहान मुलांसाठी केक म्हणजे सर्वात फेवरेट स्वीट डिश असते. अशात सध्या बाजारात सर्वत्र चीज केकची क्रेज आहे. चीज केक दिसालया देखील फार टेम्टींग असतो. त्यामुळे आता घरच्याघरी देखील चीज केक बनवता येणं शक्य आहे.
घरातल्या काही साध्या आणि सिंपल पदार्थांपासून देखील आपण चीज केक बनवू शकतो. त्यासाठी बाजारातून जास्त महागडे सिरप आणि केक बेस आणण्याची देखील गरज नाही. चला तर मग जाणून घेऊ सिंपल चीज केक रेसिपी.
साहित्य
१५ ते २० गोड बिस्कीट
१०० ग्राम दही
१०० ग्राम बटर
१ चमचा कोको पावडर
वेनीला इसेन्स
पिस्ता
कंडेस्ड मिल्क
२ चमचे क्रिम
कृती
चीज केक बनवताना सर्वात आधी बिस्कीट बारीक करून घ्या. त्यानंतर यात बटर मिक्स करा. पुढे यात कोको पावडर मिक्स करा. तसेच यामध्ये चीज आणि वेनीला इसेंन्सचे काही ड्रॉप अॅड करा.
आता केक बेक करण्यासाठी तुम्ही ओव्हनचा वापर करू शकता. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर जर्मलच्या केकच्या भांड्यात सर्व बॅटर काढून घ्या. त्यानंतर एक कुकर तापण्यासाठी ठेवा. त्याला झाकन न लावता मीठ टाकून घ्या. पुढे मीठ गरम झाल्यावर केकचं बॅटर असलेलं भांडं कुकरमध्ये ठेवा. त्यावर केके २० मिनिटे बेक होऊ द्या.
केक पूर्ण बेक झाला की नाही हे एका पातळ चमच्याच्या सहाय्याने तपासून घ्या. त्यानंतर केक गरम असतानाच बाहेर काढू नका. केक पूर्ण थंड झाल्यावर बाहेर काढा. याचे मस्त स्लाइस केल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह चीज केक एन्जॉय करू शकता.