ख्रिसमस किंवा नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये केकची चव हमखास चाखली जाते. केक बनवण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करतो पण बरेचदा प्रयत्न फसतात.
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या या काळात अनेक पार्ट्याचे आयोजन केले जाते. या काळात हमखास केक मागवला जातो. ख्रिसमस पार्टीमध्ये केकचा समावेश असतो. पण अनेकवेळा गरजेपेक्षा जास्त केक मागवतो आणि सेलिब्रेशननंतरही हा केक शिल्लक राहातो. उरलेला केक सकाळपर्यंत शिळा झाल्याने अनेकांना तो खाण्याची इच्छा उरत नाही. उरलेल्या ख्रिसमस केकचे काय कराल? त्याचा वापर करुन नवीन रेसिपी ट्राय करु शकता. या केकपासून तुम्ही मुलांसाठी शेक बनवू शकता. पाहूया रेसिपी (Left over christmas Cake Recipe Ideas)
2. कृती
केक बनवण्यासाठी सर्वप्रथम चॉकलेट एका मिनिटासाठी मायक्रोवेव्हमध्ये किंवा गरम पॅनमध्ये वितळवा.
नंतर त्यात केकचे तुकडे, दूध आणि अर्धा कप साखर घालून मिक्सर ग्राइंडरमध्ये एकत्र करा.
तयार मिश्रण सर्व्हिंग ग्लासमध्ये घाला वरुन चॉकलेटचे मिश्रण घाला.
वरुन बर्फ घालू शकता. तसेच हवे असल्यास तुम्ही फ्रुट्सचा वापर करु शकता.
उरलेल्या केकमध्ये तुम्ही आईस्क्रिम देखील घालू शकता. याची चव एकदम टेस्टी लागते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.