Lauki Juice Benefits Saam TV
लाईफस्टाईल

Lauki Juice Benefits : ब्लड प्रेशर ते शुगर कंट्रोलपर्यंत अनेक आजारांवर दुधीभोपळ्याचा ज्यूस आहे रामबाण उपाय; पिऊन तर पाहा

Benefits of Lauki Juice : आरोग्यासाठी लाभदायी असलेला हा भोपळा तुमच्या स्किनसाठी देखील खास आहे. त्यामुळे चला तर मग आज याचे चमत्कारीक फायदे जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

दुधीभोपळा आकाराने मोठा आणि स्वस्त असतो. त्यामुळे याची भाजी अनेक घरांमध्ये बनवली जाते. दुधीभोपळ्याच्या भाजीसह त्याच्या ज्यूस आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशी आहे. यामुळे अनेक आजारांवर मात करता येते. आरोग्यासाठी लाभदायी असलेला हा भोपळा तुमच्या स्किनसाठी देखील खास आहे. त्यामुळे चला तर मग आज याचे चमत्कारीक फायदे जाणून घेऊ.

हृदय निरोगी राहते

हृदयाशी संबंधीत समस्या असलेल्या व्यक्तींनी दररोज व्यायामासह दुधीभोपळ्याच्या ज्यूसचे सेवन केले पाहिजे. दुधीभोपळ्याचा ज्यूप प्यायल्याने आपले कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहते. तसेच हृदयविकाराचा झटका सुद्धा येत नाही.

पचन शक्ती सुधारते

धावपळीच्या जिवनात वेळेवर न जेवणे, अपूरी झोप या सर्वांचा परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो. अनेक व्यक्तींना अपचनाच्या समस्या जाणवतात. अपचन होत असल्यास त्या व्यक्तींनी दुधीभोपळ्याचा ज्यूस पिणे गरजेचे असते. याने पोट साफ होण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

दुधीभोपळ्याचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. तुम्ही देखील आरोग्या निट राहण्यासाठी आहारात याचा समावेश केला पाहिजे. या ज्यूसमध्ये जास्तप्रमाणात व्हिटॅमीन आणि मिनरल्स असतात. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

त्वचा उजळते

उन्हाळ्यात अनेकांना स्किन टॅन होण्याची समस्या असते. स्किन टॅन होणाऱ्या व्यक्तींनी देखील दुधीभोपळ्याचा रस पिणे चांगले असते. भोपळ्यामधील मिनरल्स आपल्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते.

ब्लड प्रेशर आणि शुगर वाढत नाही

ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशर आणि शुगरच्या समस्या असतात त्यांनी देखील आहारात दुधीभोपळा घ्यावा. त्याने ब्लड प्रेशर आणि शुगर वाढत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT