लाईफस्टाईल

Bile duct cancer: पित्तवाहिन्यांचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीर देतं 'हे' संकेत; वेळीच निदान वाचवेल तुमचा जीव

Early symptoms of Bile Duct Cancer: या कॅन्सरचं निदान अनेकदा उशीरा होतं. कारण त्याची सुरुवातीची लक्षणं सामान्य असतात. मात्र, शरीरात दिसणारी काही प्रमुख लक्षणं वेळीच ओळखल्यास, उपचारांना लवकर सुरुवात करून जीव वाचवणे शक्य होते.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर हा असा आजार आहे की त्याचं लवकर निदान फार गरजेचं आहे. यामुळे त्यावर उपचारांचे परिणाम खूप चांगले होतात. परंतु काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीची लक्षणं खूप सौम्य असतात. अनेकजण ही लक्षणं सामान्य आजारांची समजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे रुग्णांना वेळेवर माहितीच होत नाही आणि आजार उशिरा निदान होतो.

असाच एक कॅन्सर म्हणजे पित्ताशय (Gallbladder) आणि पित्तवाहिन्यांचा (Bile Duct) कॅन्सर. हा कॅन्सर जरी दुर्मिळ असला तरी तो खूप जलद पसरतो. जर याचं निदा उशिरा झालं तर उपचार करणंही कठीण होतं.

पित्ताशयाचा कॅन्सर स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत तीन ते पाच पट अधिक दिसून येतो. उत्तर भारतात या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि आता तरुणांमध्येही हा आजार वाढताना दिसतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, “उत्तर भारतातील लोकांमध्ये हा कॅन्सर तुलनेने अधिक आणि कमी वयात आढळतो. यामागे आनुवंशिक व पर्यावरणीय कारणे महत्त्वाची आहेत.”

या कॅन्सरचा सर्वात मोठा धोका कोणता?

गॉलस्टोन्स म्हणजे पित्ताशयातील खडे हा या कॅन्सरचा सर्वात मोठा जोखीमीचा घटक मानला जातो. या कॅन्सरने जवळपास 60 ते 80 टक्के रुग्णांमध्ये आधी पित्ताशयात खडे असतात. हे खडे वेळेत साध्या लेप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक सर्जरीने काढले तर भविष्यात कॅन्सरचा धोका खूप कमी होऊ शकतो.

दुसरीकडे कोलांजिओकार्सिनोमा (बाइल डक्ट कॅन्सर) हा साधारणतः वृद्धांमध्ये आढळतो.

खालील कारणांमुळे धोका वाढतो:

  • धूम्रपान

  • मद्यपान

  • लठ्ठपणा

  • संसर्ग

  • आंतड्यांची सूज

  • हिपॅटायटिस B आणि C संसर्ग

या कॅन्सरची लक्षणं काय दिसून येतात ते पाहूयात.

कावीळ (Jaundice)

त्वचा आणि डोळे पिवळे पडणं हे बाइल डक्ट कॅन्सरचं सुरुवातीचं आणि महत्त्वाचे लक्षण आहे. ट्यूमरमुळे बाइल डक्ट ब्लॉक होत असल्याने रक्तात बिलिरुबिन वाढतं आणि यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे दिसतात.

पोटाच्या उजव्या वरच्या बाजूला वेदना

पित्ताशयातील खडे आणि कॅन्सर या दोन्हीमुळे पोटाच्या उजव्या वरच्या भागात वेदना होतात. ही वेदना कधी सौम्य तर कधी तीव्र असू शकतात. कधी सतत तर कधी अधूनमधून या वेदना होऊ शकतात. लोक अनेकदा याला गॅस किंवा अॅसिडिटी समजून दुर्लक्ष करतात.

भूक न लागणं

आहारात किंवा व्यायामात कोणताही बदल न करता भूक न लागणे आणि वजन पटकन कमी होणे ही लक्षणे गंभीर आहेत. कॅन्सर पेशी शरीराची मेटाबॉलिझम प्रोसेस बदलतात.

त्वचेवर सतत खाज येणं

पित्ताचा प्रवाह अडल्याने पित्तातील क्षार त्वचेत साचतात आणि त्यामुळे खाज येते. अनेकदा रूग्णाला साधा मलम लावून किंवा गोळ्यांनी ही खाज बरी होत नाही.

उलटी आणि मळमळ

जेवणानंतर वारंवार मळमळणे किंवा उलट्या होणे हे बाइल डक्टमध्ये अडथळा असल्याचे लक्षण असू शकते. ट्यूमर मोठा होत गेल्याने पाचन प्रक्रियेवर परिणाम होतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात 'या' राशी; दिवाळीमध्ये गडगंज श्रीमंत होणार व्यक्ती

Maharashtra Politics: सोलापुरात मोठी राजकीय उलथापालथ; भाजपची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा जम्बो पक्षप्रवेश

Mumbai Bar News : मुंबईतील प्रसिद्ध बारमध्ये अल्पवयीन मुलींना दिली दारू, दोघींची प्रकृती खालवल्यामुळे खळबळ

Maharashtra Live News Update: माढ्यातील पूरग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांची औषधे

Today's horoscope: शुक्रवार शुभ! श्रवण नक्षत्र आणि शुभ योगाचा संयोग; ‘या’ राशींचं भाग्य जबरदस्त चमकणार

SCROLL FOR NEXT