Surabhi Jayashree Jagdish
सिंधुदुर्ग किल्ला हा समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला अभेद्य जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये बांधलेला हा किल्ला सागरी संरक्षणासाठी उभारला गेला.
लाटांचा प्रचंड मारा होऊनही तटबंदी आजही ठाम उभी आहे, हे त्याच्या अभियांत्रिकी कौशल्याचं उदाहरण आहे. म्हणूनच सिंधुदुर्ग किल्ल्याला 'मरीन इंजिनीयरींगचा मास्टरपीस' असं म्हटलं जातं.
इ.स. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली. सुमारे ३ वर्षांत बांधकाम पूर्ण झालं आणि तो सागरी संरक्षणाचा प्रमुख केंद्र ठरला. पोर्तुगीज, डच आणि इंग्रजांच्या सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हा जलदुर्ग उभारला गेला.
हा किल्ला मालवण किनाऱ्यापासून सुमारे १ किमी अंतरावर कुरटे बेटावर आहे. चारही बाजूंनी खोल समुद्र आणि खडकाळ तळ असल्यामुळे शत्रूला सहज प्रवेश शक्य नव्हता. नैसर्गिक खडकांच्या रचनेचा उपयोग करून तटबंदी अधिक मजबूत करण्यात आली.
किल्ल्याची तटबंदी सुमारे ३० फूट उंच आणि १२ फूट जाड आहे. त्यावेळी मोठे दगड हे शिसं वापरून घट्ट बसवले गेलेत. भिंतींना थोडासा वक्र आकार दिला आहे. ज्यामुळे लाटांचा जोर विखुरतो. त्यामुळे लाटांचा धक्का कमी होतो.
तटबंदी समुद्रसपाटीपासून उंचीवर बांधली गेली आहे, त्यामुळे भरतीच्या वेळीही ती सुरक्षित राहते. दगडांमधील शिसं मजबूत असल्याने पाण्यामुळे सैल पडत नाही.
किल्ल्याचा मुख्य दरवाजा थेट दिसत नाही तर तो वेगळ्या मार्गाने आत जातो. ही रचना शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी मुद्दाम केली होती. समुद्रमार्गे येणाऱ्यांना प्रवेशद्वार ओळखणं कठीण जात होतं.
समुद्राच्या मध्यभागी असूनही किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. नैसर्गिक जलस्रोतांचा अभ्यास करून त्या तयार केल्या गेल्या. यामुळे वेढा पडला तरी दीर्घकाळ टिकून राहणं शक्य होतं.
सुमारे ४००० कामगार आणि १०० हून अधिक कारागीरांनी हे बांधकाम केलं. समुद्रातील भरती-ओहोटी, वाऱ्याची दिशा आणि लाटांचा वेग अभ्यासून रचना ठरवली गेली. आजही ३५० वर्षांनंतर किल्ला भक्कम उभा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.