Iran-Israel War: इस्राइलच्या हल्ल्यात इराणच्या नव्या संरक्षणमंत्र्याचा मृत्यू, ४८ तासांपूर्वी स्वीकारला होता पदभार

Irans New Defence Minister Killed: इस्राइलकडून इराणवर हवाई हल्ले सुरूच आहे. या हल्ल्यामुळे इराणच्या नव्या संरक्षणमंत्र्यांचा मृत्यू झाला. सय्यद माजिद अब अल-रेजा यांनी ४८ तासांपूर्वीच संरक्षणमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला होता.
Iran-Israel War: इस्राइलच्या हल्ल्यात इराणच्या नव्या संरक्षणमंत्र्याचा मृत्यू, ४८ तासांपूर्वी स्वीकारला होता पदभार
Irans New Defence Minister KilledSaam Tv
Published On

Summary -

  • इस्राइलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या नव्या संरक्षण मंत्र्यांचा मृत्यू

  • पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या ४८ तासांतच हल्ल्यामध्ये झाला मृत्यू

  • इराण सरकारकडून हल्ल्याचा तीव्र निषेध

  • इराणने दिला बदला घेण्याचा इशारा

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराणच्या नव्या संरक्षण मंत्र्यांचा इस्राइलने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. संरक्षण मंत्री माजिद इब्न अल-रेझाई यांच्या मृत्यूमुळे इराणला मोठा धक्का बसला. ४८ तासांपूर्वीच त्यांनी इराणच्या संरक्षण मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात नव्या संरक्षण मंत्र्यांचा मृत्यू झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माजिद इब्न अल-रेझाई यांना पदावर येऊन फक्त ४८ तास झाले होते. अवघ्या ४८ तासांमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

इस्रायलने एका महत्त्वाच्या इराणी लष्करी तळाला लक्ष्य केले. त्याठिकाणी सय्यद माजिद अब अल-रेजा उपस्थित होते. हल्ला इतका जबरदस्त होता की नव्या संरक्षणमंत्र्यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात प्रगत क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करण्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे. सय्यद माजिद अब अल-रेजा यांची नुकतीच इराणचे नवे संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी यापूर्वी इराणी लष्कर आणि सुरक्षा संस्थांमध्ये अनेक वरिष्ठ पदांवर कामं केली होती. शनिवारी इराणचे संरक्षण मंत्री नासिरजादेह यांच्या निधनानंतर त्यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. पण इस्राइलकडून सतत होत असलेल्या हल्ल्यांमुळे इराणमधील परिस्थिती आणखी बिघड चालली आहे.

Iran-Israel War: इस्राइलच्या हल्ल्यात इराणच्या नव्या संरक्षणमंत्र्याचा मृत्यू, ४८ तासांपूर्वी स्वीकारला होता पदभार
Iran-US War: 'होर्मुझमध्ये जहाज दिसलं की पेटवून देणार'; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा जगाला इशारा

युद्धादरम्यान वेगाने बिघडणाऱ्या परिस्थितीमुळे नव्या संरक्षणमंत्र्यांना जास्त वेळ मिळू शकला नाही. सय्यद माजिद हे इराणच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांपैकी एक मानले जात होते. संरक्षण मंत्री होण्यापूर्वी त्यांनी इराणी सैन्यात ब्रिगेडियर जनरल पद भूषवले होते. त्यांना विशेषतः लष्करी प्रशासन आणि रसदशास्त्रातील तज्ज्ञ मानले जात होते. त्यांनी इराणच्या सर्वात प्रभावशाली संघटनांपैकी एक असलेल्या इराणच्या सशस्त्र दलांच्या सामाजिक सुरक्षा संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले होते.

Iran-Israel War: इस्राइलच्या हल्ल्यात इराणच्या नव्या संरक्षणमंत्र्याचा मृत्यू, ४८ तासांपूर्वी स्वीकारला होता पदभार
Iran Supreme Leader: इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांची संपत्ती किती?

नव्या संरक्षणमंत्र्यांच्या निधनानंतर इराण सरकारने इस्राइलने केलेल्या या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, संरक्षणमंत्र्यांच्या हत्येचा बदला घेतला जाईल. राजधानी तेहरानसह अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इराण-इस्राइल या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम नागरिकांवरही स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेक भागात वीज आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्या आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांना घराबाहेर पडू नये, सुरक्षित स्थळी थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे. इस्राइलने केलेल्या हल्ल्यातील मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढत चालला आहे.

Iran-Israel War: इस्राइलच्या हल्ल्यात इराणच्या नव्या संरक्षणमंत्र्याचा मृत्यू, ४८ तासांपूर्वी स्वीकारला होता पदभार
Iran Supreme Leader: खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणला मिळाला नवा सर्वोच्च नेता;कोणाला मिळाली जबाबदारी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com