BMC: मनसेच्या अटी ठाकरे सेनेकडून मान्य; संजय राऊत-राज ठाकरे यांची 25 मिनिटे चर्चा; बैठकीत काय- काय ठरलं?

BMC News: बीएमसी वॉर्ड कमिटी पदांवरील तणावानंतर, मनसे आणि ठाकरे सेनेमध्ये एकमत झाले आहे. राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातील २५ मिनिटांच्या महत्त्वाच्या बैठकीत काय चर्चा झाली ते जाणून घ्या.
BMC News:
Raj Thackeray and Sanjay Raut’s brief meeting sparks fresh political buzz in Mumbai.
Published On
Summary
  • प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदावरून मनसे-ठाकरे सेना वाद निर्माण झाला होता.

  • संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात २५ मिनिटांची महत्त्वाची चर्चा झाली.

  • मनसेच्या काही अटी ठाकरे सेनेकडून मान्य झाल्याची माहिती.

मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये मतभेद निर्माण झाले होते. दोन्ही पक्षांमध्ये खटके उडाल्याच्या बातम्या येत होत्या. आता मात्र त्यावर पडदा पडल्याचं सांगितलं जातंय. मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर ठाकरे सेनेने त्यांच्या अटी मान्य केल्या आहेत, अशी माहिती आहे. ठाकरेंच्या सेनेकडून मनसेला अधिकची प्रभाग समिती देण्यात येणार आहे.

BMC News:
Maharashtra Politics: 'संघर्ष करना मेरे लिये...; ऐन राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपचं टेन्शन वाढणार, महिला नेत्या पक्षाला रामराम ठोकणार?

महापालिका निवडणूक एकत्र लढलेल्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग समितीवरून वाद झाला होता. ठाकरेंच्या सेनेच्या वाट्याला येणाऱ्या नगरसेवकांपैकी एक जागा मनसेला मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु त्या बदल्यात ठाकरे सेनेकडून मनसेला प्रभाग समिती देण्याचं ठरलं होतं. दरम्यान ठाकरेंच्या सेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रभाग समिती निवडणुकीत मनसे तटस्थ राहणार अशी चर्चा सुरू होती. यानंतर संजय राऊतांनी शिवतीर्थ बंगल्यावर राज ठाकरेंची भेट घेतली. या दोघांमध्ये २५ मिनिटं चर्चा झाली. या भेटीत काय ठरलं ते जाणून घ्या.

BMC News:
Maharashtra Politics: विरोधात बसू पण शिवसेना फुटू देणार नाही, शिंदेसेनेतील दिग्गज नेत्याचं मोठं विधान

राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई आणि मनसेचे यशवंत किल्लेदार, संदीप देशपांडे यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत ठाकरेंच्या सेनेकडून मनसेला अधिकची प्रभाग समिती देण्याचा निर्णय झालाय.

मनसेला मिळणाऱ्या प्रभाग समित्या -

जी नॉर्थ 2 वर्षे

एफ साऊथ 1 वर्ष

पी पूर्व पश्चिम 1 वर्ष

एस आणि टी 1 वर्ष

यापैकी जी नॉर्थ ही प्रभाग समिती 2 वर्षांसाठी मनसेला मिळाली. मनसेला स्वीकृत नगरसेवक पद ठाकरे गटाने दिले नाही. त्याबदल्यात मनसेने वाटाघाटीत जी नॉर्थ प्रभाग समिती 2 वर्षांसाठी मिळवली आहे. या चर्चेबाबत वरुण सरदेसाई म्हणाले, मनसेच्या नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. मुंबई मनपा निवडणुका आम्ही एकत्र लढलो. आता पुढचं कामकाज एकत्र करावं ही इच्छा होती. प्रभाग समितीची निवडणूक आहे.

दोन्ही पक्ष एकत्र असले तर चांगलं होईल आणि तसाच निर्णय झालाय. एखाद्या प्रभाग समितीची काय परिस्थिती असावी यापेक्षा एकजूट महत्वाची असल्याचं सरदेसाई म्हणालेत. आम्ही सर्वच ठिकाणी एकत्र आहोत. काही समितीचे अध्यक्षपद हे काँग्रेस, ठाकरे गट आणि मनसेत वाटली जातील. तसे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना कळवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com