Liver Damage: सावधान! चेहऱ्यावर अचानक ५ लक्षणे दिसली, तर समजा लिव्हर खराब व्हायला सुरुवात झालीये

Liver Disease Symptoms On Face: सध्या खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. यकृत खराब होणे ही यापैकी एक समस्या आहे. यकृत खराब झाल्याने अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते
Liver Damage
Liver DamageSaam Tv

Liver Disease Symptoms On Face: यकृत (Liver) हा आपल्या शरीराचा महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. शरीराचे महत्वाचे काम यकृतामार्फत केले जाते. शरीरातील रक्त शुद्ध करण्यापासून ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे कार्य यकृत करते. अशा परिस्थितीत यकृताची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

Liver Damage
Relationship Tips : काय सांगता! किस केल्याने वजन कमी होतं; संशोधनातून मिळाली महत्वपूर्ण माहिती

सध्या खाण्या पिण्याच्या वाईट सवयींमुळे आरोग्याच्या (Health) अनेक समस्या निर्माण होत आहे. यकृत खराब होणे ही यापैकी एक समस्या आहे. यकृत खराब झाल्याने अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. यकृत काम करण्याचे थांबले की, शरीर अनेक संकेत देते जे ओळखून आपण यकृताशी संबंधित समस्यांचे निराकरण करू शकतो.

Liver Damage
Healthy Chutney : महिलांच्या विविध आजारांसाठी गुणकारी चटणी; एकदा खाऊन तर पाहा

यकृताच्या आजाराची लक्षणे सुरूवातीला दिसत नाही, जेव्हा ते काम करण्याचे थांबते तेव्हा त्याची चिन्हे ही चेहऱ्यावर दिसतात.

चेहऱ्यावर दिसणारी लक्षणे

1) त्वचा पिवळसर होणे

यकृताच्या आजाराचे प्रमुख लक्षण म्हणजे कावीळ. त्वचा आणि डोळे पिवळे पडणे हे यकृत खराब होण्याचे लक्षण आहे.

2) लाल तळवे

यकृताच्या आजारामुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि हाताचे तळवे लाल होतात.

3) स्पायडर

शरीरातील लहान रक्तवाहिन्या स्पायडर आहेत. कोळ्याच्या पायासारख्या असणाऱ्या या त्वचेच्या पृष्ठभागाजवळ असतात. यकृताचे आजार असल्यास त्वचेवर अँजिओमास म्हणजेच या रक्तवाहिन्या लाल आणि साधारण जांभळ्या रंगाच्या दिसतात.

3) सूज येणे

यकृताच्या समस्या असल्यास शरीरात विशेषत: चेहऱ्यावर डोळ्यांच्या भागात सूज येते व डोळे लाल होतात.

4)मुरूम आणि त्वचेच्या रंगात बदल

यकृत खराब झाल्यास त्वचेच बदल झाल्याचे दिसते ज्यात खाज सुटणे, मुरूम येणे आणि त्वचेच्या रंगात सामान्य बदल होण्याच्या समस्या उद्भवू शकतात.

डिस्क्लेमर : येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय मार्गदर्शन घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com