मालेगाव महापालिकेच्या महासभेत राडा; MIM आणि सत्ताधारी नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी, एकमेकांच्या अंगावर आले धावून|VIDEO

Malegaon Municipal Corporation: मालेगाव महापालिकेच्या विशेष महासभेत अर्थसंकल्प सादरीकरणावेळी जोरदार गोंधळ. घरपट्टी वाटपाच्या मुद्द्यावरून एमआयएम आणि सत्ताधारी नगरसेवक आमनेसामने.

अजय सोनवणे, साम टीव्ही

मालेगाव महापालिकेच्या विशेष महासभेत आज जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी बोलावण्यात आलेली ही महासभा शाब्दिक चकमकीमुळे काही काळ तणावपूर्ण ठरली. सत्ताधारी इस्लाम पार्टी आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये घरपट्टी वाटपाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला. या वादाने अचानक तीव्र स्वरूप घेतल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एमआयएमचे गटनेते अब्दुल मालिक आणि महापौर पती खालिद हाजी यांच्यात सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंचे काही नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने परिस्थिती आणखी चिघळली. काही काळ सभागृहात घोषणाबाजी आणि गोंधळ सुरू होता. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीत झालेल्या या प्रकारामुळे कामकाज ठप्प झाले. मात्र, जेष्ठ नगरसेवकांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंना शांत केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर सभेचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com