Akshaya Tritiya 2025 saam tv
लाईफस्टाईल

Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतीयेच्या दिवशी नारळाचा १ उपाय मालामाल करणार, वाचा संपूर्ण माहिती

Akshaya Tritiya : वैशाख महिन्यात येणाऱ्या अक्षय तृतीयाला काही विशेष उपाय केल्यास जीवनात सुख-समृद्धी येते. ज्योतिष शास्त्रानुसार, नारळाचे उपाय फायदेशीर ठरतात.

Saam Tv

Akshaya Tritiya 2025: हिंदू पंचांगाच्या अनुसार, वैशाख महिन्यात अक्षय तृतीया तिथी साजरी केली जाते. हिंदू धर्मात अक्षय तृतीयाला भरपूर महत्व आहे. या दिवसाला शुभ काम केले जाते. लोक या दिवसाची वर्षभर वाट पाहतात. या दिवसाला विशेष उपाय केल्यास जीवनात सुख-समृद्धी येते. ज्योतिष शास्त्राच्या अनुसार, या दिवशी नारळाचा उपाय केल्यास घरात धनसंपत्ती वाढते. तसेच देवी लक्ष्मीची विशेष कृपा लाभते.

धर्म शास्त्राच्या अनुसार, वैशाख महिन्यात येणारा अक्षय तृतीया हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नारळाचे काही उपाय केले जातात. नारळाचे उपाय केल्यास महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. धनसंपत्ती वाढते.

अक्षय तृतीयाच्या दिवशी नारळाला पूजा घरात ठेवून अक्षत, फुलं, दुर्वा, मिठाई, दूध, मध आणि गंगाजलाने पूजा करावी. नारळ तिजोरी किंवा पैसे ठेवायच्या जागेवर ठेवावा. असा उपाय केल्याने घरात धनसंपत्ती वाढत असल्याची हिंदू धर्मींयांमध्ये मान्यता आहे.

हिंदू धर्मात नारळाला विशेष महत्व दिलं जातं. नारळावरील तीन खुणा भगवान शंकराच्या तीन डोळ्यांचे प्रतीक मानले जाते. तसेच या नारळाला माता लक्ष्मीचंही स्वरुप मानलं जातं. अक्षय तृतीयाच्या दिवशी नारळाची पूजा करून लाल कपड्यात बांधून काही दिवसांसाठी तिजोरीत ठेवा.

नारळाचा उपाय केल्यास आयुष्यभर पैशांची कमतरता राहणार नाही. या व्यतिरिक्त धन प्राप्तीसाठी भगवान कृष्णासहित देवी लक्ष्मीचीही पूजा करावी. अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कमळ किंवा गुलाब अर्पण करावे. तसेच खीरीचा नैवद्य दाखवावा. हे उपाय केल्यास तुमच्या आयुष्यात धन आणि समृद्धी प्राप्त होईल.

(नोट - लेखातील माहिती धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. साम टीव्ही लेखातील माहितीला दूजोरा देत नाही. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT