
Akshaya Tritiya 2025
अक्षय्य तृतीया हा दिवस प्रत्येकासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो. या दिवशी केलेले कोणतेही काम तुम्हाला भविष्यात खूप मोठा लाभ मिळवून देऊ शकते. कसे ते पुढील माहितीतून आणि या दिवशी घडलेल्या कथेतून एकदा समजून घ्या. तुम्हाला आयुष्यभर याचा फायदा होईल. तर यंदा अक्षय्य तृतीया ३० एप्रिल २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अनेक जण सोनं विकत घेतात. तसेच या दिवशी तुम्ही आयुष्यात केलेल्या चांगल्या कामांचे योग्य फळ तुमच्या पदरात पडते.
'न क्षय इति अक्षय' म्हणजेच जो व्यक्ती कधीही पराजीत नाही होत. तसेच जी व्यक्ती कधीही दुसऱ्याचे वाईट करत नाही किंवा खूप काम, कष्ट, मेहनत करत नाही. (Which date is Akshaya Tritiya 2025?) अशा व्यक्तींचा अक्षय्य होतो. त्या व्यक्तीला या दिवशी योग्य फळ मिळते. लक्ष्मी आणि कुबेर देव या दिवशी अनेकांना त्यांच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी आशिर्वाद देतात. तसेच या दिवशी कुबेर देव आणि लक्ष्मी देवीची आवडणारी कामे म्हणजे शुभ कार्ये, पुजा, दान-पुण्य करतात त्यांच्यावर प्रसन्न होतात.
अक्षय्य तृतीयेची पौराणिक कथा (what happened on akshaya tritiya)
हिंदू धर्मातील पौराणिक कथेनुसार अक्षय्य तृतीयेला अनेक महत्वाचा घटना घडल्या आहेत. तुम्ही भगवान परशुरांबद्दल या आधी ऐकलेच असेल. (The Birth of Lord Parashurama) यांनाच भगवान विष्णूचा सहावा अवतार मानला जातो. परशुराम यांचा जन्म हा अक्षय्य तृतीयेला झाला आहे. तसेच या दिवशी त्रेता युगाची सुरुवात झाली असे मानले जाते. हिंदू विश्वविज्ञानातील चार युगांपैकी एक असलेल्या त्रेता युगाची सुरुवात मानली जाते.
गंगेचे अवतरण
काही परंपरेनुसार, गंगा नदी या दिवशी पृथ्वीवर अवतरली असे सुद्धा मानले जाते. इतकेच नाही तर अक्षय्य तृतीयेला सत्कर्म आणि दान करण्यासाठीचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. कारण या दिवशी दान केल्याने तुमचे धन कधीही कमी होत नाही असे मानले जाते.
अक्षय्य तृतीयेला काय करावे? पुजा, दान धर्म, खरेदी संपुर्ण माहिती
अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णू, कुबेर आणि माता लक्ष्मीची पुजा केली जाते. तसेच या दिवशी जोडप्याने गरजूंना दान-धर्म केले जाते. समृद्धी प्राप्तीसाठी सोने किंवा चांदी खरेदी केले जाते. या दिवशी पैशाची गुंतवणूक सुरू करणे शुभ मानले जाते. एकंदरीत, अक्षय्य तृतीया हा आध्यात्मिक वाढीसाठी, भौतिक समृद्धीसाठी आणि नविन सुरुवातीचा उत्सव आहे.