Saam Tv
सध्या आंब्यांचा सिझन सुरू आहे. घरात आंबे तर असतातच.
तुम्ही याच आंब्यांपासून पुण्यातील फेमस आणि नावाजलेला ज्युस म्हणजेच Mango Mastnai घरी तयार करू शकता.
Mango Mastnai लहान मुलांसाठी खूप पोष्टीक असते. तुम्ही रोज एक ग्लास सेवन करू शकता.
३ आंब्यांचा गर, दीड कप दूध, ड्रायफ्रुट्स, ३ चमचे साखर, वेनिला इसेन्स क्रिम, ६ चेरी, बर्फाचे गोळे इ.
ड्रायफ्रुट्स आणि ६ चेरी कापून घ्या.
आता मिक्सरचे भांडे घ्या. त्यामध्ये आंब्यांचा गर, साखर आणि दूध घालून घट्टसर मिल्कशेक तयार करून घ्या. सर्व्हिंग ग्लासेसमध्ये घाला.
ज्युस सर्व्हिंग ग्लासेसमध्ये घाला. त्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम किंवा मॅंगो आईस्क्रीम घाला.
तुमच्या स्वादिष्ठ मॅंगो मस्तानीवर आता चिरलेले ड्रायफ्रुट्स आणि बेरीजने सजवा.
आता मॅंगो मस्तानी थंड करून किंवा त्यात बर्फ घालून सर्व्ह करा.