Saam Tv
उन्हाळ्यात आपण शक्यतो आहार कमी आणि पाण्याचं प्रमाण जास्त वाढवतो.
तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या काही हलके पदार्थच खाल्ले पाहिजेत.
उन्हाळ्यात तुम्ही जड पदार्थ खाल्याने तुम्हाला पचनाला अधिक त्रास होऊ शकतो. त्यासाठी पुढील पदार्थांची निवड नाश्त्यासाठी योग्य ठरेल.
पोहे हा नाश्ता शरीरासाठी पचायला हलका आणि झटपट तयार होणारा असतो.
सकाळच्या नाश्त्यात तुम्ही दही आणि बेरीज किंवा केळी खाऊ शकता. तसेच मध किंवा चिया सिड्सचा समावेश करू शकता.
तुम्ही अंड, केळ आणि अवोकाडो यांचं मिश्रण करून ऑमलेट तयार करू शकता.
सर्वभाज्यांचा वापर करून तुम्ही हलका फुलका रव्याचा नाश्ता पोटभर करू शकता.
बदामाचे दूध आणि ओट्स एक वाटी खाल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळतील. शिवाय पोट भरलेलं राहील.