Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Sakshi Sunil Jadhav

नागपंचमीचे धार्मिक महत्त्व

नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने राहू- केतूशी संबंधित त्रास कमी होतात आणि घरात सुख-शांती नांदते. यंदा नाग पंचमी १७ ऑगस्ट रोजी असणार आहे.

Nag Panchami | pintrest

या वस्तू वापरणं टाळा

काही ज्योतिषीय परंपरांनुसार लोखंडी तवा आणि कढई हे राहूचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे त्यांचा वापर टाळल्याने नकारात्मकता कमी होते.

Why not use tawa on Nag Panchami | pintrest

राहू आणि मंगळ

श्रद्धेनुसार, लोखंडी तवा आगीवर तापवल्याने राहू आणि मंगळाच्या ऊर्जेचा प्रतिकूल संयोग निर्माण होऊ शकतो. त्याने भांडण वाढू शकतात.

Why avoid kadhai on Nag Panchami | pintrest

स्वयंपाकाचे महत्त्व

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणं शुभ मानलं जातं. तर नागपंचमीला साधा आणि सात्विक स्वयंपाक केला जातो.

Importance of cooking | pintrest

वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराचे महत्त्व

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणे शुभ मानले जाते. या दिशेतील ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी नागपंचमीला साधा आणि सात्त्विक स्वयंपाक करण्याचा सल्ला दिला जातो.

Importance of cooking | pintrest

उकडलेले पदार्थ

बऱ्याच ठिकाणी नागपंचमीला तळलेले पदार्थ न बनवता उकडेले किंवा वाफवलेले पदार्थ खाण्याची प्रथा असते.

Spiritual traditions | pintrest

लोखंडी भांड्याबद्दलची मान्यता

काही वास्तू मतांनुसार लोखंडाचा संबंध शनी आणि राहुशी जोडला जातो. त्यामुळे या दिवशी लोखंडी भांड्यांचा कमी वापर करावा अशी परंपरा आहे.

Vastu kitchen tips | pintrest

महिलांचे आरोग्य

लोकमान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी काही धार्मिक नियम पाळल्यास घरातील महिलांचे आरोग्य आणि कुटुंबातील सकारात्मक वातावरण टिकून राहते, असे मानले जाते.

Steamed food on Nag Panchami | pintrest

नागपंचमीचे उपाय

नागदेवतेची पूजा करावी, दूध किंवा फुले अर्पण करावीत, घरात स्वच्छता ठेवावी, सात्त्विक आहार घ्यावा आणि गरजूंना अन्नदान करणे हे शुभ मानले जाते.

Snake worship festival

टीप

नागपंचमी हा श्रद्धा, संस्कृती आणि निसर्गाबद्दल आदर व्यक्त करण्याचा सण आहे. तवा किंवा कढई न वापरण्याची प्रथा ही काही ज्योतिष आणि वास्तु परंपरांमध्ये सांगितली जाते, परंतु ती धार्मिक श्रद्धेचा भाग आहे. साम टिव्ही याच्याशी समर्थन करत नाही.

Snake worship festival

NEXT : रात्री घरात लादी पुसणं योग्य की अयोग्य? स्वच्छता तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा...

Night Mopping | meta ai
येथे क्लिक करा